Viral Video: नृत्य ही एक अशी कला आहे, जी अनेकांना आवडते. अनेक जण आवड म्हणून, तर काही जण फक्त सण-समारंभ आणि लग्नांमध्ये आनंद साजरा करण्यासाठी नृत्य करतात. त्याशिवाय यामुळे शरीराचा व्यायामही होतो आणि ताणतणावही कमी होण्यास मदत मिळते.
दरम्यान, हल्ली सोशल मीडियामुळे खूप आवडीने डान्स करणाऱ्यांचे प्रमाण खूप वाढत चालले आहे. सोशल मीडिया हा डान्स, गाणी अशा विविध कला सादर करणाऱ्यांसाठी एक उत्तम प्लॅटफॉर्म ठरत आहे. अगदी लहानांपासून ते तरुण, वृद्ध अशा विविध वयोगटांतील लोकांना तुम्ही विविध गाण्यांवर थिरकताना पाहिले असेल. आताही असाच एक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय.समाजमाध्यमांवर सतत विविध गाणी व्हायरल होत असतात, ज्यातील काही गाणी ही जुनी असतात. परंतु, त्या गाण्यांवरील रील्समुळे ती गाणी पुन्हा खूप चर्चेत येतात. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतील चिमुकलीदेखील अशाच एका जुन्या मराठी गाण्यावर डान्स करताना दिसतेय.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक चिमुकली ‘पोरी जरा हळू हळू चाल’ या जुन्या मराठी गाण्यावर सुंदर डान्स करताना दिसतेय. यावेळी व्हिडीओच्या सुरुवातीलाच चिमुकलीने केलेली स्टेप पाहून तुम्हीही तिचे कौतुक कराल आणि तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून अवाक् व्हाल. सध्या तिचा हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.
युजर्सच्या कमेंट्स चर्चेतएका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय, ‘खूप सुंदर डान्स.” दुसऱ्या युजरने लिहिलेय, ”अय्या, किती गोड आहे ही”. आणखी एकाने लिहिलेय, ”खूप क्यूट, बेबी.” तर इतर अनेक जण चिमुकलीचे कौतुक करताना दिसत आहेत.