व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

SBI e-mudra Loan पात्रता

या योजनेअंतर्गत नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्या उद्योजकांना किंवा प्रस्थापित फायदेशीर संस्थाद्वारे त्यांच्या व्यवसायाचा विस्तार करू पाहणाऱ्यांना हे कर्ज मिळू शकते. एसबीआय ई-मुद्रा कर्ज हे ग्रामीण आणि शहरी भागात नॉन कॉर्पोरेट स्मॉल बिजनेस सेगमेंट मध्ये काम करणारे व्यक्तींसाठी उपलब्ध आहे. हे कर्ज मिळवण्यासाठी या विभागामध्ये एखाद्या व्यक्तीची मालकी किंवा भागीदारी व्यवसाय समाविष्ट आहेत जे खालील प्रमाणे आहेत:

  • दुकान मालक
  • उत्पादन विक्रेते
  • ट्रकचालक
  • लहान उत्पादन युनिट्स
  • सेवा क्षेत्रातील युनिट्स
  • अन्न सेवा ऑपरेटर
  • दुरुस्तीची दुकाने
  • मशीन ऑपरेटर
  • लघुउद्योग
  • कारागीर
  • अन्नप्रक्रिया उद्योग

या योजनेसाठी अर्ज करणारा अर्जदार हा 18 ते 60 वयोगटातील असणे आवश्यक आहे.

एसबीआय बँकेमध्ये अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे बचत खाते असणे गरजेचे आहे, जर एखाद्या व्यक्तीचे बचत खाते एसबीआय बँकेमध्ये असेल तर तो ई-मुद्रा कर्जासाठी पात्र आहे. हे बचत खाते किमान सहा महिन्यासाठी खुले आणि सक्रिय असणे आवश्यक आहे.

SBI e-mudra Loan आवश्यक कागदपत्रे

एसबीआय बँकेकडून ई-मुद्रा कर्ज व्यवसायासाठी मिळवण्यासाठी काही महत्त्वाच्या कागदपत्रांची आवश्यकता असते. ती कागदपत्रे कोणत्याही आपण सविस्तरपणे खाली पाहूया:

शिशु ई-मुद्रा कर्ज कागदपत्रे

  • जीएसटी नोंदणी प्रमाणपत्र
  • उद्योग आधार डिटेल्स्
  • एसबीआय खाते तपशील
  • दुकान आणि स्थापना प्रमाणपत्र तपशील

किशोर आणि तरुण श्रेणी ई-मुद्रा कर्ज आवश्यक कागदपत्रे

  • ओळखीच्या पुरावा (मतदार ओळखपत्र, पॅन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट इ.)
  • पत्त्याच्या पुरावा (पासपोर्ट, युटिलिटी बिले, मालमत्ता कर पावत्या इ.)
  • बँक स्टेटमेंट मागील सहा महिन्याचे
  • व्यवसायासाठी लागणारी उपकरणे किंवा यंत्रसामग्री खरेदीसाठीचे किंमत कोटेशन
  • व्यवसाय ओळखपत्रासाठी आधार आणि स्थापनेचा पुरावा आवश्यक
  • मागील 2 वर्षातील व्यवसायाचा ताळेबंद, नफा,तोटा, भागीदारी करार आणि कायदेशीर कागदपत्रे

SBI e-mudra Loan अर्ज प्रक्रिया

स्टेट बँक ऑफ इंडिया कडून मुद्रा लोन मिळवण्यासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रियेची स्टेप बाय स्टेप माहिती खालील प्रमाणे:

  • SBI e-mudra Loan मिळवण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला या वेबसाईटवर जावे लागेल.👇🏽👇🏽👇🏽 https://emudra.bank.sbi:8044/emudra/basic-details
  • या ठिकाणी तुम्हाला एक पॉप अप दिसेल, जो की हिंदी आणि इंग्रजी दोन्ही मध्ये सूचना प्रदर्शित करेल. त्या ठिकाणी स्किप करून ठीक आहे वर क्लिक करा.
  • नंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल तिथे तुम्हाला पुढे जाण्यासाठी भाषा निवडण्यास सांगितले जाईल त्या ठिकाणी तुम्ही एक भाषा निवडा आणि पुढे जा वर क्लिक करा.
  • आता तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर एसबीआय बचत किंवा चालू खाते क्रमांक आणि कर्जाची रक्कम प्रविष्ट करून कॅप्च्या प्रविष्ट करून सत्यापित करा.
  • वरील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढे जा या बटणावर क्लिक करा.
  • SBI e-mudra Loan अर्ज व्यवस्थित भरून आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करा.
  • ई-स्वाक्षरी करून अटी व नियम स्वीकारा.
  • ई-स्वाक्षरीसाठी तुमचा आधार वापरण्यास संमती देण्यासाठी तुमचा आधार क्रमांक द्या.
  • त्यानंतर तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर वर एक ओटीपी प्राप्त होईल. तो ओटीपी तुमच्या कर्जाचा अर्ज पूर्ण करण्यासाठी रिकाम्या जागी भरा, त्यानंतर तो अर्ज सबमिट करा.

अशा पद्धतीने तुम्ही SBI e-mudra Loan मिळवण्यासाठी अर्ज करू शकता.

SBI e-mudra Loan हेल्पलाइन नंबर

एसबीआय ई-मुद्रा कर्ज कर्जाबाबत तुम्हाला काही मदत हवी असल्यास तुम्ही खालील हेल्पलाइन नंबर वर जाऊन मदत घेऊ शकता.

  • 1800 1234 (टोल फ्री)
  • 1800 11 2211 (टोल फ्री)
  • 1800 425 3800 (टोल फ्री)
  • 1800 2100 (टोल फ्री)
  • 080-26599990

सदर लेखांमध्ये आपण SBI e-mudra Loan कसे मिळवायचे याबद्दलची संपूर्ण माहिती सदर लेखाच्या माध्यमातून पाहिली आहे. सदर माहितीच्या आधारे तुम्ही एसबीआय कडून ई-मुद्रा कर्ज मिळवू शकता. आम्ही आशा करतो की तुम्हाला हा लेख नक्कीच आवडलेला असेल. धन्यवाद!

Leave a Comment