पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेचा अर्ज अर्जदाराला दोन पद्धतीने भरता येतो. आपण या योजनेचा ऑनलाईन व ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने अर्ज कसा करायचा याविषयीची स्टेप बाय स्टेप माहिती पाहूया:
पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना ऑनलाइन अर्ज प्रक्रिया
- पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेचा अर्ज ऑनलाईन भरण्यासाठी सर्वप्रथम अर्जदाराला या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.👇🏽👇🏽👇🏽 https://www.kviconline.gov.in/pmegpeportal/jsp/pmegponline.jsp
- पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेचा अर्ज भरण्यासाठी मार्गदर्शक तत्वाचे अनुसरण करून तुमची माहिती सर्व आवश्यक तपशिलासह भरा.
- सर्व आवश्यक तपशील भरल्यानंतर भरलेले ट्रॅक सेव्ह करण्यासाठी ‘सेव्ह एप्लीकंट डेटा’ वर क्लिक करा.
- तुम्ही तुमचा डेटा सेव्ह केल्यानंतर तुम्हाला अर्ज सबमिट करण्यासाठी सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावे लागतील.
- अर्ज पूर्ण करून सबमिट केल्यानंतर अर्जदाराचा आयडी क्रमांक आणि पासवर्ड त्याच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर वर पाठवला जाईल.
पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना ऑफलाइन अर्ज प्रक्रिया
- अर्जदाराला ऑफलाइन अर्ज करण्यासाठी अर्जामध्ये आवश्यक माहिती भरा.
- सर्व माहिती अचूक स्वरूपात भरल्यानंतर अर्ज मसुदा म्हणून जतन करा.
- अर्जाची प्रिंटआउट घ्या.
- अर्जाची प्रिंटआउट जवळच्या कार्यालयात जमा करा.
- या योजनेच्या संबंधित बँकेने केलेल्या सर्व औपचारिकता पूर्ण करा.
अशा पद्धतीने पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेचा अर्ज ऑफलाईन व ऑनलाईन पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने कोणालाही भरता येतो.
सदर लेखांमध्ये आपण पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेविषयीची संपूर्ण माहिती अचूक स्वरूपात देण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये आपण या योजनेची उद्दिष्टे वैशिष्ट्ये कर्जाचा कालावधी आवश्यक कागदपत्रे अर्ज प्रक्रिया ही माहिती पाहिली आहे. आम्ही आशा करतो की तुम्ही या माहितीच्या आधारे या योजनेचा लाभ नक्की घ्याल. धन्यवाद!