नमस्कार मित्रांनो सदर लेख हा देशातील सर्वोत्तम वैयक्तिक कर्ज देणारे ५ चांगले एप्लीकेशन कोणते आहेत याविषयीचा आहे. आजच्या घडीला पैसा हा एक मूलभूत गरज म्हणून ओळखला जात आहे. जीवन जगताना पैशाचे महत्व खूपच आहे कारण जीवनावश्यक वस्तू त्याचबरोबर चैनीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी त्याचबरोबर आरोग्यविषयक गोष्टीसाठी पैशांकडे विनिमयाचे साधन म्हणून पाहिले जाते. परंतु काही वेळा एखादा असा प्रसंग येतो की त्यावेळी जवळील पैसा कमी पडतो अशावेळी कर्ज काढण्या शिवाय कोणताच पर्याय उरत नाही. म्हणूनच कोणतीही व्यक्ती सावकाराकडून कर्ज काढून कर्जबाजारी होण्यापेक्षा आपण या लेखांमध्ये ज्या पर्सनल लोन ॲप ची माहिती पाहणार आहोत या ॲपच्या माध्यमातून वैयक्तिक कर्ज काढून सावकारी कर्जपाशात एखादा व्यक्ती अडकणार नाही.
वैयक्तिक कर्ज लग्न, गाडी, बंगला, शिक्षण, व्यवसाय, आरोग्य विषयक बाबी घेणे आज-काल कॉमन झाले आहे. यापूर्वी ही कर्ज हे बँका व इतर वित्तीय संस्था कडून मिळवले जात असे. पण या वित्तीय संस्थांची कर्ज देण्याची प्रोसेस खूपच संथ गतीने असल्यामुळे कर्ज मिळवण्यासाठी खूपच वेळ लागत असे. पण सध्या या डिजिटल युगामध्ये कर्ज मिळवणे हे खूपच सोपे झाले आहे. पर्सनल लोन देणाऱ्या खूप सार्या बँका किंवा पर्सनल लोन एप्लीकेशन बाजारामध्ये आलेले आहेत. त्यांच्या माध्यमातून पर्सनल लोन हे खूपच जलद मिळते त्याचबरोबर त्यांची पर्सनल लोन देण्याची प्रोसेस पण खूपच सोपी आहे.
सदर लेखांमध्ये आपण देशातील सर्वोत्तम ५ वैयक्तिक कर्ज देणाऱे ॲप विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. चला तर मग पाहूया हे ॲप विषयीची सविस्तर माहिती.
Dhani (धनी) Personal Loan App
धनी लोन अँड सर्विस लिमिटेड ही सध्याची देशातील खूपच लोकप्रिय पर्सनल लोन देणारी कंपनी म्हणून ओळखली जात आहे. या कंपनीद्वारे ग्राहकांना पर्सनल लोन जलद आणि तत्परतेने आणि सोप्या प्रोसेस द्वारे पुरवले जाते. सुरुवातीच्या काळात वैयक्तिक लोन देण्यासाठी ही कंपनी प्रसिद्ध नव्हती. पण नंतरच्या काळामध्ये पर्सनल लोन या प्रकारामध्ये या कंपनीने खूप मोठी प्रगती केलेली दिसून येते. पर्सनल लोन मध्ये ही कंपनी मेडिकल लोन, लग्नासाठी कर्ज, वाहन कर्ज यासारख्या सुविधा घेण्यासाठी ही कंपनी पर्सनल लोन उपलब्ध करून देते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे धनी लोन अँड सर्विस लिमिटेड ही कंपनी गृहकर्ज देत नाही.
धनी द्वारे मोबाईल ॲप्लिकेशन च्या माध्यमातून ग्राहकांना आर्थिक सेवा पुरवल्या जातात. त्यांचे प्रमुख लक्ष हे वैयक्तिक कर्ज देण्यावर आहे. धनी कडून वैयक्तिक कर्ज ग्राहकांच्या सिबिल स्कोर च्या आधारावर दिले जाते. धनी हे त्यांच्या ऍप द्वारे पात्र व्यक्तींना त्वरित किंवा जलद वैयक्तिक कर्ज देते. पर्सनल लोन साठी पात्र झालेले व्यक्तींना डिजिटल पद्धतीने अर्ज आणि कर्जाची रक्कम प्राप्त करता येते. धनी ॲपच्या माध्यमातून मोबाईल द्वारे 1000 ते 15 लाख रुपये पर्यंतचे पर्सनल लोन मिळते. या कर्जावर 13.99% पासून व्याजदर आकारले जातात.
हे ॲप्लिकेशनच्या माध्यमातून कर्ज मिळवण्यासाठी ग्राहकांना अर्ज करणे खूपच सोपे आहे यासाठी केवळ पॅन कार्ड आणि आधार कार्ड ची गरज असते. हे कर्ज 3 ते 24 महिन्याच्या मुदतीसाठी घेता येते, परंतु घेतलेल्या कर्जाची वेळेत परतफेड करणे खूप आवश्यक आहे नाहीतर कर्जदाराला वेगवेगळ्या अडचणींना सामोरे जावे लागू शकते.
वैयक्तिक कर्जाबरोबरच धनी च्या वेबसाईटवर किराणा, कपडे, इलेक्ट्रिक वस्तू, घर सजावटीच्या वस्तू याही उपलब्ध आहेत. वेबसाईटवरून ग्राहक shop now pay later चा उपयोग करू शकतात आणि खरेदी केल्यानंतर ठराविक मुदतीमध्ये खरेदी केलेल्या वस्तूचे पैसे भरू शकतात.
धनी ॲप द्वारे कर्जाची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे. अर्ज करताना वैयक्तिक आणि आर्थिक माहिती अर्जामध्ये देणे आवश्यक आहे. अर्जदाराने दिलेल्या माहितीच्या आधारावर कंपनी कर्जासाठी पात्रतेचे मूल्यांकन करण्यासाठी वापरते त्यानुसार कर्जाची रक्कम ठरवली जाते.
Home Credit (होम क्रेडिट) Personal Loan App
होम क्रेडिट पर्सनल लोन ॲपचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे ॲप आपत्कालीन परिस्थितीत ग्राहकांना कर्जाच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य करते. होम क्रेडिट द्वारे कर्ज प्रक्रिया ही डिजिटल पद्धतीने राबवली जाते.
होम क्रेडिट पर्सनल लोन हे 5 लाख रुपये पर्यंत मिळू शकते. ऑनलाईन अर्ज प्रक्रियेमुळे होम क्रेडिट पर्सनल लोन हे जलद मंजूर केले जाते, त्याचबरोबर तातडीने बँक खात्यात जलद व सुनिश्चित वितरित केले जातात. होम क्रेडिट पर्सनल लोन साठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराने अर्ज करताना आवश्यक कागदपत्रांच्या डिजिटल प्रति ऑनलाईन अपलोड करणे आवश्यक आहे.
होम क्रेडिट पर्सनल लोन घेण्यासाठी कोणत्याही कारणाची आवश्यकता नसते. त्याचबरोबर वैयक्तिक कर्जासाठी गॅरंटीची सुद्धा आवश्यकता नसते. होम क्रेडिट पर्सनल लोन चे व्याजदर हे कर्जाची रक्कम व कर्जाचा कालावधी त्याचबरोबर अर्जदाराच्या पतपात्रतेनुसार बदलू शकतात. संपूर्ण कर्जाच्या कालावधीसाठी व्याजदर हे सुनिश्चित केले जातात म्हणजे एकदा निश्चित केलेला व्याजदर कर्ज फेडेपर्यंत बदलत नाही. होम लोन पर्सनल लोन साठी व्याजदर 19% ते 49 % पर्यंत बदलतो. त्याचबरोबर 5% प्रक्रिया शुल्क ही लागू होते. होम क्रेडिट पर्सनल लोन चा कालावधी 36 ते 51 महिन्यांदरम्यानचा असतो.
होम क्रेडिट पर्सनल लोन घेताना अर्जदाराचे वय 19 ते 60 वर्षे दरम्यान असावे, त्याचबरोबर अर्जदाराचे उत्पन्न किमान 5000 रुपये आवश्यक आहे. सिबिल स्कोर ची गरज या होम क्रेडिट पर्सनल लोन साठी नाही. अर्ज करणारा अर्जदार हा नोकरदार किंवा स्वयंरोजगार असणे आवश्यक आहे.
होम क्रेडिट पर्सनल लोन साठी पॅन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट किंवा मतदान ओळखपत्र यापैकी एक असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर बँक स्टेटमेंट किंवा व्यवसाय असेल तर त्या व्यवसायाचे आर्थिक स्टेटमेंट उत्पन्नाच्या पुराव्यासाठी आवश्यक आहे. रोजगाराचा पुरावाही अनिवार्य आहे.
Google Pay(गुगल पे) Personal Loan App
गुगल पे ॲप मुळे सध्या अनेक व्यवहार होत आहेत. या ॲपमुळे सुट्ट्या पैशाच्या कटकटीतून ग्राहकांची कायमची सुटका झाली आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. गुगल पे मुळे आर्थिक व्यवहार तर होतातच पण गुगल पे द्वारे वैयक्तिक कर्ज सुद्धा दिले जाते. नुकतेच गुगल पे ने दोन लाख रुपये पर्यंतच्या कर्जाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यासाठी गुगल पे ने डीएमआय फायनान्स लिमिटेड या कंपनीशी करार केला आहे या करानुसार दोन्ही कंपन्या डिजिटल स्वरूपातील वैयक्तिक कर्ज देत आहेत.
गुगल पे द्वारे पर्सनल लोन दोन लाखापर्यंत डिजिटल पद्धतीने मिळू शकते. या कर्जाचा परतफेड करण्याचा कालावधी 36 महिन्याचा आहे. सध्या ही सुविधा डी एम आय फायनान्स लिमिटेड च्या सहभागाने देशात फक्त 15000 पिन कोड वर उपलब्ध आहे. यासाठी ग्राहकाकडे गुगल पे अकाउंट असणे आवश्यक आहे. हे पर्सनल लोन मिळवण्यासाठी चांगली क्रेडिट हिस्टरी असणे आवश्यक आहे. तरच या ॲपवरून कर्ज मिळू शकते.
गुगल पे ॲप द्वारे वैयक्तिक कर्ज घ्यायचे असेल तर सिबिल स्कोर चांगला असणे गरजेचे आहे त्याचबरोबर डीएमआय फायनान्स मधील प्री क्वालिफाईड एलिजिबिल हे कर्ज मिळू शकतील आणि गुगल पे द्वारे हे कर्ज देण्यात येईल.
गुगल पे ॲप द्वारे पर्सनल लोन मिळवण्यासाठी अर्जदाराकडे आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक, पत्त्याचा पुरावा, विज बिल, पासपोर्ट साईज फोटो या कागदपत्रांची आवश्यकता असते.
Navi (नावी) Personal Loan App
फ्लिपकार्ट चे को-फाउंडर सचिन बंसल यांनी नावी कर्ज आणि आरोग्य विमा विकसित केले आहे. जे एक सोईस्कर डिजिटल कर्ज घेण्याचे ॲप म्हणून काम करते. या ॲपद्वारे वैयक्तिक कर्ज हे किमान 3 महिने ते कमाल 72 महिन्यांच्या कालावधीसाठी जास्तीत जास्त 20 लाख रुपये पर्यंतचे कर्ज देते. जर एखाद्या व्यक्तीकडे आधार कार्ड आणि पॅन कार्ड असेल तर ही कर्ज मिळवणे खूपच सोपे आहे. ही कर्ज मिळवण्यासाठी ची अर्ज प्रक्रिया खूपच सोपी आणि पूर्णपणे ऑनलाईन आहे. या कर्जासाठी कोणत्याही व्यक्तीची प्रत्यक्ष भेट किंवा संवादाची आवश्यकता नाही. म्हणजेच हे कर्ज मिळवण्यासाठी कोणत्याही मध्यस्थी किंवा ब्रोकरची आवश्यकता नावी पर्सनल लोन घेण्यासाठी नाही.
नावी पर्सनल लोन चा व्याजदर हा वार्षिक 9.9% ते 45% पर्यंत शिलकीच्या आधारावर राहतो.
नावी पर्सनल लोन ॲप हे कमाल 30 वर्षाच्या कालावधीसाठी पाच कोटी किंवा मालमत्ता मूल्याच्या 90% पर्यंत ग्रह कर्ज देते. शिवाय नावी आरोग्य विमा आणि म्युच्युअल फंड सुद्धा ऑफर करते. नाव्ही ॲप चे व्यवस्थापन नावी टेक्नॉलॉजीस लिमिटेड द्वारे केले जाते. ही एक उल्लेखनीय नॉन डिपॉझिट टेकिंग NBFC (ND-SI) जी जी आरबीआय कायदा 1934 च्या कलम 45Aअंतर्गत भारतीय रिझर्व बँक मध्ये नोंदणी करत आहे. याचा अर्थ असा आहे की नावी आरबीआयच्या नियमक फ्रेमवर्क मध्ये कार्य करते आणि कायदेशीर वित्तीय संस्था म्हणून ओळखले जाते.
नावी पर्सनल लोन ॲप चे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्वरित कर्ज वितरण केले जाते, त्याचबरोबर 100 टक्के पेपरलेस प्रक्रिया आहे, ग्राहकांना सोयीस्कर असे ईएमआय पर्याय उपलब्ध करून दिले जातात, त्याचबरोबर तारण किंवा जामीनदाराची गरज हे वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी लागत नाही.
Airtel Payment Bank (एअरटेल पेमेंट बँक) Personal Loan App
पर्सनल लोन घेण्यासाठी एअरटेल पेमेंट बँक हा एक सर्वोत्तम पर्याय आहे. एखाद्या व्यक्ती घरबसल्या एअरटेल पेमेंट बँक पर्सनल लोन ॲपच्या माध्यमातून लोन घेऊ शकतो. एअरटेल पेमेंट बँकेकडून कर्ज घेण्यासाठी उत्पन्नाचा पुरावा देण्याची गरज नसते. या बँकेकडून पर्सनल लोन हे 50 हजार रुपयांपर्यंतचे सहजरित्या पाच मिनिटांमध्ये उपलब्ध होते. कर्जाची रक्कम थेट बँक खात्यात ट्रान्सफर केली जाते.
एअरटेल पेमेंट बँकेकडून वैयक्तिक कर्ज घेतल्यानंतर या कर्जाचा परतफेड चा कालावधी बारा महिने ते साठ महिने आहे तेही हप्त्याच्या स्वरूपात ही कर्ज फेडायचे आहे. या कर्जाचा व्याजदर 9% ते 15 टक्के पर्यंत आहे. हा व्याजदर तुमच्याकडे कोणती कागदपत्रे आणि तुमचे बँकेची असणारे संबंध यावर अवलंबून राहतो त्याचबरोबर तुमचा क्रेडिट स्कोर किंवा सिबिल स्कोर चांगला असणे आवश्यक आहे.
एअरटेल पेमेंट बँकेकडून कर्ज मिळवण्यासाठी अर्जदाराला आधार कार्ड (मोबाईल नंबर ची लिंक असणे अनिवार्य आहे.) पॅन कार्ड बँक खाते बँकेचे सहा महिन्याचे बँक स्टेटमेंट मोबाईल नंबर ईमेल आयडी वरील सर्व कागदपत्रे कर्ज मिळवण्यासाठी अनिवार्य आहेत.