PayDay लोनची online अर्जप्रक्रिया सोपी आहे. खालीलप्रमाणे प्रक्रिया पूर्ण करता येते
- सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या कर्जदार संस्थेचे ॲप डाऊनलोड करावे लागेल
- आता तुम्ही लोन प्रदात्याच्या मोबाईल अॅपवर जाऊन तुमचा आधार लिंक असलेला मोबाईल क्रमांक प्रविष्ट करा.
- त्यांनतर OTP प्रविष्ट करून लॉगिन करून घ्या. PayDay Loan साठी अर्ज करण्यासाठी Apply Now या पर्यायावर क्लिक करा.
- अर्ज करताना तुमची आवश्यक माहिती जसे की नाव, पत्ता, मोबाइल नंबर, ई-मेल आयडी आणि उत्पन्न स्त्रोत भरणे आवश्यक आहे.
- कागदपत्रांसह काही महिन्यांच्या बँक स्टेटमेंटची प्रत upload करायची आहे, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती समजू शकेल.
- प्रमुख कागदपत्र जसे की आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे ओळखीचे पुरावे म्हणून आवश्यक आहेत. त्याच बरोबर उत्पन्नाचा पुरावा म्हणून पगाराची स्लिप किंवा फ्रीलान्सर असाल तर उत्पन्नाचे इतर पुरावे आवश्यक आहेत.
- अर्ज सबमिट केल्यानंतर तुमचा अर्ज आणि कागदपत्रांची पडताळणी केली जाते
- कागदपत्रे पडताळल्यानंतर काही मिनिटांतच लोन मंजूर केले जाते आणि लोनची रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात ट्रांसफर होते.
परतफेड प्रक्रिया
लोन मंजूर झाल्यानंतर दिलेल्या मुदतीतच लोन परतफेड करणे आवश्यक आहे, कारण PayDay लोनचे पुनर्भरण कालावधी खूपच कमी असतो (7 ते 30 दिवस).
महत्वाचे: PayDay लोन घेताना व्याजदर आणि कमी परतफेड कालावधी लक्षात घेऊन विचारपूर्वक निर्णय घ्या.