Navi Personal Loan App पात्रता

Navi ॲप हे देशातील मध्यमवर्गीयांना त्यांच्या मोबाईल ॲप्लिकेशन द्वारे परवडणाऱ्या व्याजदरावर वैयक्तिक कर्ज त्वरित घेण्याची संधी देते. याविषयीची पात्रता काय आहे ते खालील प्रमाणे:

  • या ॲपद्वारे कर्ज घेणारी व्यक्ती ही भारतीय असावी.
  • वयोमर्यादा ही 21 ते 65 वर्षे दरम्यान असावी.
  • या योजनेसाठी पात्र व्यक्ती हे पॅन कार्ड धारक, आधार कार्ड धारक, पगारदार किंवा स्वयंरोजगार आहेत.
  • त्याचबरोबर नावी पर्सनल लोन ॲप मिळवण्यासाठी एखाद्या व्यक्तीचा सिबिल स्कोर चांगला असणे आवश्यक आहे.

Navi personal loan app आवश्यक कागदपत्रे

नावी पर्सनल लोन ॲप मिळवण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत:

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • कर्ज घेणाऱ्या व्यक्तीची सेल्फी अपलोड करणे आवश्यक

Navi Personal Loan व्याजदर

नावी पर्सनल लोन व्याजदर हा दरवर्षी 9.9% पर्यंत आकारला जातो. हा व्याजदर एखाद्या व्यक्ती किती कर्ज घेतो त्याचबरोबर तो हे कर्ज परत करण्यासाठी किती वेळ घेतो आणि हे कर्ज मिळवण्यासाठी एखादा व्यक्ती पात्र आहे का यावर हा व्याजदर अवलंबून असतो. तसे पाहायला गेले तर या नावी पर्सनल लोन चा व्याजदर निश्चित स्वरूपाचा आहे. अद्यावत व्याजदरावर एखाद्या व्यक्तीला 3.99% ते 6% प्रक्रिया शुल्क देखील द्यावे लागते.

Navi Personal Loan मिळवण्यासाठीची संपूर्ण प्रक्रिया

नावी पर्सनल लोन मिळवण्यासाठीची संपूर्ण प्रक्रिया आपण खाली स्टेप बाय स्टेप स्वरूपात दिली आहे.

  • सर्वप्रथम गुगल प्ले स्टोअर वरून  तुमच्या मोबाईल फोनवर Navi Personal Loan App डाऊनलोड करा.👇🏽👇🏽👇🏽👇🏽👇🏽 https://play.google.com/store/apps/details?id=com.naviapp
  • हे ॲप डाऊनलोड केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला नवीन वैयक्तिक कर्ज पर्याय निवडायचा आहे.
  • त्यानंतर तुम्ही तुमच्या मोबाईल नंबर टाकून साइन अप करा.
  • नंतर तुम्ही फक्त तुमची मूलभूत माहिती भरा म्हणजे तुम्ही कर्जासाठी पात्र आहात का नाही ते तपासा.
  • पुढे तुम्ही तुम्हाला हवी असलेली कर्ज आणि ईएमआय रक्कम निवडा.
  • केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुम्ही तुमचा एक सेल्फी आणि आधार अपलोड करा.
  • त्यानंतर सर्वात शेवटी तुमचा बँक तपशील भरा जेणेकरून नावी पर्सनल लोन ॲप द्वारे तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करता येतील.
हे ही महत्वाचे👉  जमीन आणि गाव नकाशा वेबसाईटवर कसा पाहायचा

अशा सोप्या पद्धतीने तुम्ही नावी पर्सनल लोन अँप द्वारे कर्ज मिळवू शकता.

आपण सदर लेखांमध्ये Navi Personal Loan App द्वारे वैयक्तिक कर्ज कसे मिळवायचे हे अगदी संक्षिप्त स्वरूपात आणि सोप्या पद्धतीने मांडले आहे. तुम्ही या माहितीच्या आधारे या ॲपच्या द्वारे वैयक्तिक कर्ज मिळवाल. आम्ही आशा करतो की तुम्हाला हा लेख नक्कीच आवडेल. धन्यवाद!

Leave a Comment