नमस्कार, महाराष्ट्र सरकार तसेच केंद्र सरकार हे देशातील तसेच राज्यातील नागरिकांसाठी नेहमीच कोणत्या ना कोणत्या योजना त्यांच्या फायद्यासाठी राबवत असते. महाराष्ट्र मध्ये बांधकाम कामगार योजना मोठ्या प्रमाणावर सरकारकडून राबवण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत राज्य सरकार बांधकाम कामगार योजनेतील कामगारांना घरामध्ये लागणाऱ्या अत्यावश्यक वस्तू म्हणजेच 30 वेगवेगळ्या भांड्यांचा संच संच देणार आहे तेही अगदी मोफत. ह्या सर्व वस्तू बांधकाम कामगारांना देण्याचा राज्य सरकारचा महत्त्वाचा हेतू म्हणजे महाराष्ट्र राज्यातील बांधकाम विभागातील सर्व प्रकारच्या कामगारांचे हात बळकट करून त्यांचे दैनंदिन जीवन सुखकर करणे हा आहे.
राज्य सरकार द्वारे ही योजना 18 एप्रिल 2020 रोजी पासून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मार्फत सुरू केली गेली. या योजनेचा फायदा राज्यातील प्रत्येक कामगाराला मिळावा यासाठी राज्य सरकारने एक अधिकृत पोर्टल फक्त कामगारांकरता सुरू केले आहे. MAHABOCW असे या पोर्टलचे नाव आहे. या योजना अंतर्गत बांधकाम क्षेत्रातील कामगारांना वेगवेगळ्या प्रकारचे लाभ मिळतात. या योजनेचा लाभ सर्व प्रकारचे कामगार म्हणजेच कुशल तसेच या सर्वांना मिळणार आहे.पण आपण त्यातील एक भाग म्हणजे 30 वस्तूंचा गृह उपयोगी भांड्यांचा संच व पाच हजार रुपयाची आर्थिक मदत बांधकाम कामगारांना कशी मिळते याबद्दलची संपूर्ण माहिती सदर लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.
आपण या योजने बद्दल सविस्तर माहिती या लेखाच्या माध्यमातून घेणार आहोत यामध्ये आपण या योजनेसाठीची पात्रता त्याचबरोबर भांडी संच मिळवण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात त्याचबरोबर अर्ज प्रक्रिया काय आहे याबद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.
बांधकाम कामगार योजनेबद्दल थोडक्यात…
बांधकाम कामगार योजना ही महाराष्ट्र सरकारच्या महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याण मंडळ या विभागाद्वारे राबवली जाते. या योजनेची सुरुवात 18 एप्रिल 2020 रोजी पासून झाली. या योजनेचा उद्देश कामगारांना या योजनेच्या माध्यमातून अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा व त्याचबरोबर आर्थिक मदत करून त्यांचे राहणीमान सुधारणे हे आहे. या योजनेतून बांधकाम कामगारांना 30 वेगवेगळ्या ग्रह उपयोगी भांड्यांचा संच त्याचबरोबर पाच हजार रुपये पर्यंत आर्थिक मदत दिली जाते. या योजनेची अर्ज प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने करता येते.
बांधकाम कामगार योजनेची उद्दिष्टे
बांधकाम कामगार योजनेची उद्दिष्टे खालील प्रमाणे आहेत.
१. या योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुलभ आणि सोपी करणे तसेच बांधकाम क्षेत्राशी निगडित असणाऱ्या सर्व कामगारांना मदत करणे.
२. या योजनेअंतर्गत शासनाद्वारे पुरवल्या जाणाऱ्या सर्व योजनांची माहिती कामगारापर्यंत पोहोचवणे त्याचबरोबर त्यांना या योजनेअंतर्गत आर्थिक मदत करून त्यांचे मनोबल वाढवणे.
३. या योजनेअंतर्गत कामगारांच्या सुरक्षिततेचा विचार करून त्यांचे भविष्य सुखकर करणे व त्यांच्या उज्वल भविष्यासाठी सोयी सुविधा उपलब्ध करून देणे.
या योजनेच्या माध्यमातून कामगारांना जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे तसेच कामगारांच्या कौशल्यावर आधारित त्यांना कामाचा पुरवठा करणे.
बांधकाम कामगार योजना पात्रता व निकष
बांधकाम कामगार योजने अंतर्गत भांड्यांचा संच मिळवण्यासाठीची पात्रता व निकष खालील प्रमाणे:
- अर्जदार कामगार हा मूळचा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
- या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदार कामगाराची वयोमर्यादा किमान 18 वर्षे ते 60 वर्षाच्या दरम्यान असावी.
- या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदार कामगारांनी किमान 90 दिवस अगोदर काम केलेले असावे.
- अर्जदार कामगारांनी कल्याणकारी मंडळामध्ये कामगार म्हणून नोंदणी करणे आवश्यक आहे.
वरील सर्व निकष व पात्रता पूर्ण असणारा अर्जदार कामगार या योजनेसाठी पात्र असेल.
बांधकाम कामगार योजना आवश्यक कागदपत्रे
बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे देणे अर्जदाराला आवश्यक असते. ती आवश्यक कागदपत्रे कोणती खालील प्रमाणे:
- कामगाराचे आधार कार्ड
- उत्पन्नाचा दाखला
- रेशन कार्ड
- कामगाराच्या वयाचे प्रमाणपत्र
- ओळख प्रमाणपत्र
- 90 दिवसांच्या कामाचा पुरावा
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
या योजनेचा लाभ घेण्यासाठी वरील सर्व कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे. कामगार योजनेचा अर्ज भरताना अर्जदारांनी ही कागदपत्रे सोबत ठेवणे आवश्यक आहे.