बांधकाम कामगार योजना| योजनेअंतर्गत कामगारांना मिळणार विवाहासाठी 30 हजार रुपये…

नमस्कार,  सदर लेखांमध्ये आपण महाराष्ट्र सरकारची एक बांधकाम कामगारांसाठी सरकारकडून राबवण्यात येत असलेली एक महत्त्वाची योजना म्हणजे बांधकाम कामगार योजना होय. या योजनेमध्ये बांधकाम कामगारांच्या साठी सरकारने सर्व पायाभूत सुविधा देण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यातील बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणारे कामगार हे गरिबांनी आर्थिक दृष्ट्या मागास असतात त्याचबरोबर ते कमी पगारावर काम करत असल्यामुळे त्यांना पायाभूत सुविधावरही खर्च करता येत नाही त्यामुळे बाकीच्या गोष्टी त्यांच्या आवाक्याच्या बाहेरच्याच असतात. त्यामध्ये लग्न ही एक खूप मोठी गोष्ट आहे.

या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकारने बांधकाम कामगारांना त्यांच्या लग्नासाठी पैशाची चणचण भासू नये म्हणून त्याचबरोबर कोणताही कामगार सावकाराकडून लग्नासाठी कर्ज उचलून कर्जबाजारी होऊ नये यासाठी या योजनेच्या माध्यमातून शासनाने बांधकाम कामगार मंडळामार्फत राज्यातील सर्व कामगारांच्या या आर्थिक अडचणीचा विचार करून राज्य शासनाच्या कामगार विभागाने नोंदणीकृत कामगाराच्या पहिल्या विवाहाच्या खर्चासाठी 30 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्याचे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाने घोषित केले आहे. या योजनेअंतर्गत देण्यात येणारी रक्कम लाभार्थी कामगाराच्या बँक खात्यात DBT च्या साह्याने जमा करण्यात येते.

बांधकाम कामगार योजनेविषयी थोडक्यात…

ही योजना महाराष्ट्र सरकारच्या इमारत व इतर बांधकाम कामगार विभागामार्फत राबवली जाते. या योजनेच्या माध्यमातून नोंदणीकृत बांधकाम कामगार पायाभूत सुविधा घेऊ शकेल अशा वस्तूंचा त्याचबरोबर आर्थिक मदतीचा पुरवठा कामगारांना केला जातो. राज्य सरकारने ही योजना 18 एप्रिल 2020 पासून सुरू केली. या योजनेचा फायदा राज्यातील प्रत्येक नोंदणीकृत बांधकाम कामगारांना मिळण्यासाठी सरकारने एक अधिकृत पोर्टल MAHABOCW सुरू केले आहे. पोर्टलचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हे पोर्टल फक्त कामगारांकरता सुरू करण्यात आले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून बांधकाम कामगार योजनेअंतर्गत कामगारांना वेगवेगळ्या प्रकारचे लाभ घेता येणार आहेत. त्यामुळे ही योजना कामगारांच्या साठी खूपच महत्त्वाची आहे.

हे ही महत्वाचे👉  जमीन मोजणी ॲप डाऊनलोड करा |Land Area rea Calculator alculator App Download

बांधकाम कामगार योजना (विवाह योजना) उद्दिष्टे

बांधकाम कामगार योजनेची महत्त्वाची उद्दिष्टे खालील प्रमाणे:

  • राज्यातील नोंदणी केलेल्या तसेच बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना त्यांच्या विवाहासाठी ३०,००० रुपये आर्थिक मदत राज्य सरकार द्वारे देण्यात येणार आहे. हे या योजनेचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे.
  • या योजनेअंतर्गत नोंदणी झालेल्या कामगारांनी त्यांच्या लग्नाच्या खर्चासाठी कोणावरही अवलंबून राहू नये त्याचबरोबर कोणत्याही खाजगी सावकाराकडून जास्त व्याजदराने कर्ज घेऊन ते कर्जबाजारी होऊ नयेत या उद्देशाने कामगारांच्या विवाहासाठी ३०,००० रुपयांची मदत राज्य सरकारद्वारे दिले जाते.

बांधकाम कामगार योजना (विवाह योजना) वैशिष्ट्ये

बांधकाम कामगार योजनेची वैशिष्ट्ये खालील प्रमाणे:

  • या योजनेअंतर्गत नोंदणीकृत कामगारांना त्यांच्या विवाहासाठी ३० हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते.
  • या योजनेअंतर्गत मिळणारे आर्थिक सहाय्य हे लाभार्थ्याच्या बँक खात्यात DBT मार्फत जमा केले जाते.

Leave a Comment