नमस्कार, सदर लेखामध्ये आपण महाराष्ट्र शासनाची एक महत्त्वाची योजना म्हणजे बांधकाम कामगार योजना याविषयीची माहिती पाहणार आहोत. बांधकाम कामगार योजनेमध्ये कामगारांच्या साठी अनेक महत्त्वपूर्ण योजना आहेत त्यामधील आपण बांधकाम कामगारांच्या मुलींच्या विवाहासाठी या योजनेमध्ये 51 हजार रुपयांची तरतूद राज्य शासनाकडून केली आहे याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत.
राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या मुलींना त्यांच्या लग्नासाठी राज्य शासनाकडून या योजनेअंतर्गत 51 हजार रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. या योजनेमुळे बांधकाम कामगारांच्या मुलींच्या लग्नासाठी एक खूप मोठी मदत शासनाकडून आर्थिक स्वरूपात केली जाणार असल्यामुळे बांधकाम कामगारांना एक प्रकारचे आर्थिक सहाय्य या योजनेतून मिळणार आहे.
चला तर मग पाहूया या योजनेविषयीची संपूर्ण माहिती यामध्ये आपण या योजनेचा लाभ मिळवण्याची पात्रता, त्याचबरोबर योजनेचा उद्देश, योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या योजनेसाठी अर्ज कसा करायचा याविषयीचे संपूर्ण माहिती आपण या लेखातून पाहणार आहोत.
बांधकाम कामगार योजनेविषयी थोडक्यात….
बांधकाम कामगार योजना ही महाराष्ट्र शासनाकडून राबवली जाते. या योजनेचा उद्देश म्हणजे नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या मुलींना त्यांच्या विवाहासाठी आर्थिक मदत करणे हा आहे. सदर योजनेचा लाभ हा नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या मुली घेऊ शकतात. या योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांच्या मुलींच्या लग्नासाठी 51 हजार रुपयांच्या आर्थिक मदत राज्य शासनाकडून दिली जाते.
बांधकाम कामगार हे कामासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सतत स्थलांतर करत असतात. कारण त्यांना एकाच ठिकाणी शाश्वत रोजगार उपलब्ध नसल्यामुळे ते त्यांच्या उदरनिर्वाहासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी रोजगाराच्या शोधात स्थलांतर करत असतात. त्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्याकडून विविध प्रकारच्या योजना या कामगारांसाठी राबवल्या जात असतात. या योजनेचा एक भाग म्हणून बांधकाम कामगारांना गृह उपयोगी भांड्यांचा संच, बांधकाम कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती अशा अनेक योजना सरकार राबवत असते. अशाच एक योजनेचा भाग म्हणून नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या मुलींना लग्नासाठी 51 हजार रुपयांची मदत सरकारकडून दिली जाते.
बांधकाम कामगार योजना (विवाह योजना) आवश्यक कागदपत्रे
बांधकाम कामगार विवाह योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे महत्त्वाचे आहेत, त्यामध्ये कामगारांच्या मुलींच्या कागदपत्रासोबतच बांधकाम कामगाराचे म्हणजेच मुलींच्या पालकांचे/वडिलांचे देखील आवश्यक कागदपत्रे सादर करणे महत्त्वाचे आहे. ही कागदपत्रे कोणती आहेत ते खालील प्रमाणे:
मुलींच्या पालकांची कागदपत्रे
- बांधकाम कामगाराचे आधार कार्ड
- पॅन कार्ड
- रहिवासी प्रमाणपत्र
- बांधकाम कामगार काम करत असलेल्या ठिकाणाचा पत्ता
- नोंदणी अर्ज
- पासपोर्ट साईज फोटो ३
- जन्म प्रमाणपत्र
- बँक पासबुक
- बांधकाम कामगाराने मागील वर्षात किमान 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र
- ग्रामपंचायतीचे बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र
- बांधकाम कामगाराचे स्वतःचे घोषणापत्र
बांधकाम कामगारांच्या मुलींची कागदपत्रे
- विवाह प्रमाणपत्र
- मुलीच्या वयाचा पुरावा
- अर्जदार मुलगी ही बांधकाम कामगाराची मुलगी असल्याचा पुरावा
वरील कागदपत्रे या योजनेचा लाभ घेण्यासाठी खूपच महत्त्वाची आहेत. या योजनेचा अर्ज भरताना अर्जदाराकडे ही कागदपत्रे असणे गरजेचे आहे जर कागदपत्रे नसतील तर तो या योजनेसाठी पात्र होणार नाही.