बांधकाम कामगार योजनेचा लाभ घेणाऱ्या व्यक्तीला खालील पात्रता व अटीमध्ये बसणे आवश्यक आहे. त्या अटी व पात्रता खालील प्रमाणे:
- बांधकाम कामगार योजनेसाठी अर्ज करणाऱ्या कामगाराची नोंद महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाकडे झालेली असणे आवश्यक आहे.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा महाराष्ट्राचा रवाशी असणे आवश्यक आहे.
- या योजनेअंतर्गत बांधकाम कामगाराच्या विवाहासाठी दिली जाणारे आर्थिक मदत ही कामगाराच्या पहिल्या विवाहासाठीच दिली जाते.
- या योजनेअंतर्गत बांधकाम कामगार विवाहासाठी ३० हजार रुपयांची आर्थिक मदत मिळवण्यासाठी त्याची उत्पन्न मर्यादा ६ लाख रुपये पर्यंत असणे आवश्यक आहे.
बांधकाम कामगार विवाह योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार व्यक्तीने वरील पात्रता व अटी पूर्ण करणे आवश्यक आहे, तरच तो या योजनेचा लाभ घेऊ शकेल.
बांधकाम कामगार योजना (विवाह योजना) आवश्यक कागदपत्रे
बांधकाम कामगार विवाह योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे:
- आधार कार्ड
- रहिवाशी दाखला
- जन्माचा दाखला (शाळा सोडल्याचा दाखला)
- पॅन कार्ड
- विवाह नोंदणी प्रमाणपत्र
- बांधकाम कामगार योजना अंतर्गत कामगार आणि 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र
- कायमच्या पत्त्याचा पुरावा
- ई-मेल आयडी
- मोबाईल नंबर
- प्रथम विवाह असल्याबाबतचे प्रमाणपत्र
- बँक पासबुक झेरॉक्स
- नोंदणी अर्ज
- पासपोर्ट साईज ३ फोटो
- बांधकाम कामगार काम करत असलेल्या बांधकामाच्या ठिकाणाचा पत्ता
- ग्रामपंचायतील ग्रामसेवकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र
- घोषणापत्र
वरील सर्व कागदपत्रे ही अर्ज करताना अर्जदाराकडे असणे आवश्यक आहेत.
बांधकाम कामगार योजना (विवाह योजना) अर्ज प्रक्रिया
बांधकाम कामगार योजनेअंतर्गत कामगाराच्या विवाहासाठी मिळणारी आर्थिक मदत घेण्यासाठी अर्जदाराला अर्ज करणे आवश्यक आहे. या योजनेचा अर्ज हा ऑफलाईन स्वरूपात भरावा लागणार आहे. या योजनेच्या अर्जाची स्टेप बाय स्टेप माहिती खालील प्रमाणे:
- या योजनेचा अर्ज भरण्यासाठी सर्वप्रथम अर्जदाराला शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरून या योजनेचा अर्ज डाऊनलोड करून घ्यायचा आहे.👇🏽👇🏽👇🏽 https://mahabocw.in
- अर्ज डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला या अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती अचूक स्वरूपात आणि काळजीपूर्वक भरायची आहे.
- त्यानंतर या योजनेसाठी लागणारी सर्व कागदपत्रे झेरॉक्स स्वरूपात अर्जासोबत जोडायची आहेत.
- त्यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज बांधकाम विभाग अधिकाऱ्याकडे सादर करायचा आहे.
- अशाप्रकारे तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया अगदी सोप्या पद्धतीने पूर्ण करू शकता.
सदर लेखांमध्ये आपण बांधकाम योजनेअंतर्गत कामगारांच्या विवाहासाठी मिळणारे 30 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य याविषयीची संपूर्ण माहिती अगदी अचूक स्वरूपात दिलेली आहे. सदर माहितीचा आधार घेऊन तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता, जर तुम्ही बांधकाम कामगार योजनेअंतर्गत नोंदणी केली असेल तर. आम्ही आशा करतो की तुम्हाला हा लेख नक्कीच आवडलेला असेल. धन्यवाद!