बांधकाम कामगार योजना (विवाह योजना) पात्रता

बांधकाम कामगार योजना (विवाह योजना) या योजनेसाठी राज्य सरकारने बांधकाम विभागाअंतर्गत काही पात्रता ठरवून दिलेल्या आहेत. या पात्रता कोणत्या आहेत त्या खालील प्रमाणे:

  • या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराने महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याण मंडळात नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे.
  • बांधकाम कामगार विवाह योजनेचा फायदा केवळ नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या मुलींनाच मिळणार आहे.
  • विवाहासाठी ही योजना केवळ एकाच मुलीसाठी उपलब्ध आहे. म्हणजेच बांधकाम कामगार हा त्याच्या फक्त एकाच मुलीसाठी या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
  • बांधकाम कामगार हा मागील तीन वर्षापासून किमान 180 दिवस कामगार म्हणून त्याने काम केलेले असणे आवश्यक आहे.
  • बांधकाम कामगाराच्या मुलीचा विवाह संपन्न झाल्या बाबतचे विवाह नोंदणी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • बांधकाम कामगारांनी नोंदणी केलेल्या नोंदीत त्याच्या ओळखपत्रातील कुटुंबाच्या तपशीलात मुलीच्या नावाची नोंद असणे गरजेचे आहे.
  • या योजनेअंतर्गत फक्त पहिल्या विवाहासाठीच अर्थसहाय्य दिले जाते.
  • लग्न झालेल्या मुलीचे वय 18 वर्षापेक्षा कमी असू नये याबाबत वयाचा पुरावा सादर करणे आवश्यक आहे. (ओळखपत्रातील नोंद/जन्माचा दाखला/शाळा सोडल्याचा दाखला/बोनाफाईड सर्टिफिकेट)
  • अर्जदार मुलीचे शिक्षण हे किमान १०वी पर्यंत झालेले असणे आवश्यक आहे, मुलगी जर ९ वी किंवा त्यापेक्षा कमी शिकलेली असेल किंवा मध्येच शिक्षण सोडून दिले असेल तर या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

बांधकाम कामगार योजना (विवाह योजना) अर्ज प्रक्रिया

बांधकाम कामगार विवाह योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धती ऑफलाइन स्वरूपाची आहे. या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराला अर्ज हा ऑफलाईन स्वरूपात कार्यालयामध्ये जाऊन  जमा करावा लागतो. या योजनेची अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे:

  • या योजनेचा अर्ज भरण्यासाठी सर्वप्रथम अर्जदाराला शासनाच्या अधिकृत वेबसाईटवरून या योजनेचा अर्ज डाऊनलोड करून घ्यायचा आहे.👇🏽👇🏽👇🏽 https://mahabocw.in
  • अर्ज डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला या अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती अचूक स्वरूपात भरावी लागणार आहे, अर्जामध्ये कोणतीही चूक अर्जदाराकडून अपेक्षित नाही त्यामुळे हा अर्ज काळजीपूर्वक भरायचा आहे.
  • त्यानंतर या योजनेसाठी लागणारी सर्व आवश्यक कागदपत्रे देखील अर्जासोबत जोडायची आहेत, अर्जासोबत जोडायची सर्व कागदपत्रे ही झेरॉक्स स्वरूपात असावीत.
  • त्यानंतर तुम्हाला तुमचा फॉर्म बांधकाम विभाग अधिकाऱ्याकडे सादर करायचा आहे. किंवा हा फॉर्म तुम्ही बांधकाम कामगार योजनेसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या मेळाव्यामध्ये सुद्धा सादर करू शकता.

सदर लेखांमध्ये आपण बांधकाम कामगार योजनेमधील एक योजना म्हणजे बांधकाम कामगारांच्या मुलींच्या विवाहासाठी सरकारकडून 51 हजार रुपयाची जी मदत मिळणार आहे या योजनेविषयीची सर्व माहिती अचूक स्वरूपात देण्याचा प्रयत्न केला आहे. या माहितीच्या आधारे तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकाल अशी आम्ही आशा करतो. धन्यवाद!

Leave a Comment