व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

बांधकाम कामगार योजना पात्रता

बांधकाम कामगार योजनेची पात्रता खालील प्रमाणे:

  • अर्जदार हा मूळ महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
  • अर्जदाराचे वय 18 ते 60 वर्षाच्या दरम्यान असावे.
  • अर्ज करणाऱ्या कामगारांनी किमान 90 दिवस काम केलेले असणे आवश्यक आहे.
  • कामगार कल्याणकारी मंडळाने कामगारांची नोंदणी करावी.
  • कामगाराचे नाव महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणी केलेले असावे.
  • कामगाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांच्या आत असणे आवश्यक आहे.
  • योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांच्या पहिल्या दोन मुलांसाठीच ही योजना लागू आहे.
  • जर बांधकाम कामगार केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरू असलेल्या एखाद्या योजनेचा लाभ घेत असेल तर अशा परिस्थितीत त्या कामगाराला या योजनेचा लाभ दिला जात नाही.
  • इतर क्षेत्रातील कामगारांना या योजनेचा लाभ दिला जात नाही.

बांधकाम कामगार योजनेचे फायदे

बांधकाम कामगार योजनेचे फायदे खालील प्रमाणे:

  • बांधकाम कामगारांना या योजनेअंतर्गत प्रतिवर्ष 5000 रुपये पर्यंत आर्थिक मदत दिली जाते.
  • या योजनेअंतर्गत कामगारांना टूल बॉक्स आणि गृह उपयोगी भांडी पुरवली जातात.
  • या योजनेअंतर्गत कामगारांच्या साठी ऑनलाईन पोर्टल उपलब्ध असल्यामुळे कामगारांना या योजनेची संबंधित कोणतेही कामे करण्यासाठी सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही.

बांधकाम कामगार योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या वस्तू

बांधकाम कामगार योजनेअंतर्गत कामगारांना दिल्या जाणाऱ्या वस्तू खालील प्रमाणे:

  • बॅग
  • रिफ्लेक्टर जॅकेट
  • सेफ्टी हेल्मेट
  • चार कप्प्याचा जेवणाचा डबा
  • सेफ्टी बूट
  • सोलर टॉर्च
  • सोलर चार्जर
  • पाण्याची बॉटल
  • मच्छरदाणी जाळी
  • हातमोजे
  • चटई
  • पेटी

बांधकाम कामगार योजना अर्ज प्रक्रिया

बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच मिळवण्यासाठी खालील पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे त्याविषयीची स्टेप बाय स्टेप माहिती पाहू:

  • या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.👇🏽👇🏽👇🏽 https://mahabocw.in
  • या वेबसाईटवर गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला होम पेजवर कामगार हा पर्याय दिसेल या पर्यावर क्लिक करून नंतर कामगार नोंदणी पर्याय वर क्लिक करा.
  • नोंदणी फार्ममध्ये अर्जदाराला त्याची सर्व आवश्यक माहिती काळजीपूर्वक भरा.
  • योजनेसाठी लागणारी आवश्यक अशी सर्व कागदपत्रे अपलोड करा.
  • आणि सर्वात शेवटी सबमिट या पर्यायावर क्लिक करा.

या योजनेच्या अधिक माहितीसाठी हेल्पलाइन नंबर: 1800-233-0012

Leave a Comment