व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

Low CIBIL Score Personal Loan | कमी सिबिल स्कोर वर मिळवा 35 हजार रुपयांचे वैयक्तिक कर्ज…

नमस्कार, आपण या लेखांमध्ये Low CIBIL Score 35,000 Personal Loan कसे मिळवायचे याविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. आजकाल प्रत्येक व्यक्तीला त्याच्या दैनंदिन जीवनामध्ये विविध खर्च करणे आवश्यक असते. त्यामध्ये विवाह खर्च, जीवनावश्यक वस्तूसाठीचा खर्च, मुलांच्या शिक्षणावरील खर्च, आरोग्य विषयक बाबींसाठीचा खर्च ह्या बाबींवर खर्च करणे अत्यंत गरजेचे असते. यातील ठराविक बाबींवर होणारे खर्च हे अकस्मात असल्यामुळे अशा बाबींवर खर्च करण्यासाठी पैशाची तजवीज करणे अवघड जाते. हे खर्च एकामाहून एक येत असल्यामुळे महिन्याच्या उत्पन्नातून त्यांचा ताबा घेणे थोडेसे अवघड जाते, अशा परिस्थितीमध्ये कर्ज घेण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नसतो.

Low cibil score loan apply

वरील गरजांची पूर्तता करण्यासाठी कर्ज घेताना बँका किंवा वित्तीय संस्था तुमचा सिबिल स्कोर तपासत असतात. सिबिल स्कोर वर तुम्हाला कर्ज द्यायचे की नाही हे ठरवले जाते. सिबिल स्कोर हा 300 ते 900 दरम्यान मोजला जातो. साधारणपणे सिबिल स्कोर 750 किंवा त्याहून अधिक असेल तर कर्ज मिळण्यास सोपे जाते. Low CIBIL score असेल तर तुम्हाला कर्ज मिळणे खूप अवघड होऊन बसते आणि ते मिळाले तरी तुम्हाला ते खूप जास्त व्याजदराने मिळते.सदर लेखांमध्येच आपण low CIBIL score 35,000 personal loan कसे मिळवायचे याबद्दलची सविस्तर माहिती सदर लेखांमध्ये पाहणार आहोत.

सिबिल स्कोर विषयी थोडक्यात…

सिबिल स्कोर हा कर्ज घेणाऱ्या व कर्जाची परतफेड करणारे व्यक्तीची गुणवत्ता दर्शवणारा आलेख आहे. ज्याद्वारे एखाद्या व्यक्तीला कर्ज द्यायचे की नाही हे या सिबिल स्कोर वर ठरवली जाते. सिबिल स्कोर हा 300 ते 900 च्या दरम्यान मोजला जातो. 750 च्या पुढे असणारा सिबिल स्कोर कर्ज घेण्यासाठी खूपच चांगला मानला जातो, 750 सिबिल स्कोर असेल तर कर्ज हे झटपट बँका किंवा वित्तीय संस्थांकडून मंजूर केले जाते.

काही कारणांमुळे लोकांचे सिबिल स्कोर खराब झालेले असतात त्यामुळे त्यांना सहजपणे कर्ज उपलब्ध होत नाही म्हणूनच अशावेळी खराब क्रेडिट स्कोर असतानाही तुम्हाला एनबीएफसी सारख्या वित्तीय संस्था वैयक्तिक कर्ज देतात.

Low CIBIL Score 35,000 Personal Loan कसे मिळवायचे?

Low CIBIL score 35,000 personal loan कसे मिळवायचे याविषयीचे महत्त्वाचे मुद्दे खालील प्रमाणे:

  • संयुक्त कर्ज: तुमचे उत्पन्न जर चांगले असेल तर तुम्ही संयुक्त कर्जाची निवड देखील करू शकता किंवा तुमचा low CIBIL score असल्यास तुम्ही एखाद्याला जामीनदार बनवून कर्ज मिळवू शकता. तुमच्या संयुक्त कर्ज धारकाचा किंवा जामीनदाराचा सिबिल स्कोर चांगला असेल तर तुम्हाला कर्ज मिळवण्यास कोणतीही अडचण येणार नाही. याचा आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे जर तुमची सह अर्जदार  महिला असेल तर तुम्हाला व्याजदरातही फायदा मिळू शकतो.
  • पगारावर कर्ज: तुमच्या सिबिल स्कोर व्यतिरिक्त सर्व वित्तीय संस्था कर्ज देताना तुमचा पगार पाहत असतात. तुमचा low CIBIL score असेल तर तुम्ही पगार वार्षिक, बोनस किंवा इतर अतिरिक्त उत्पन्नाच्या स्त्रोताचा पुरावा देऊन बँक किंवा इतर कोणत्याही वित्तीय संस्थेकडून कर्ज घेऊ शकता. तुमच्या पगाराद्वारे तुम्ही हे सिद्ध करू शकता की तुम्ही या कर्जाची परतफेड करण्यास सक्षम आहात.
  • बँक एफडी वर कर्ज: तुमची एखाद्या बँकेमध्ये एफडी असेल आणि तुम्हाला ती सध्या खंडित करायचे नसेल तर तुम्ही त्या एफडीवर बँकेकडून कर्ज घेऊ शकता. बँका एफडीवर जमा केलेला रकमेच्या 90 ते 95 टक्के रक्कम कर्ज म्हणून देतात. ओव्हरड्राफ्ट सुविधा उपलब्ध असेल तर तुम्ही या सुविधांतर्गत ठेव रकमेच्या 90 टक्के पर्यंत रक्कम घेऊ शकता. कर्जाची ही रक्कम सुरक्षित कर्जाच्या श्रेणीमध्ये ठेवली जाते. कारण बँक कर्जाच्या बदल्यात एफडी गहाण ठेवते. एफडी कर्जावर एफडीदारापेक्षा दोन टक्के व्याजदर जास्त असतो, मात्र यासाठी कोणतेही प्रोसेसिंग शुल्क नाही. कर्ज म्हणून घेतलेल्या रकमेवरच व्याजदर आकारले जातो.
  • बिगर बँकिंग वित्तीय संस्था: वैयक्तिक कर्जासाठी बिगर बँकिंग वित्तीय संस्थेमध्ये देखील कर्जासाठी अर्ज करता येतो. Low CIBIL score असला तरी इथून तुम्हाला कर्ज मिळू शकते. पण येथून मिळणाऱ्या कर्जाचा व्याजदर हा बँकांपेक्षा जास्त असतो.
  • सोने कर्ज: जर तुमच्याकडे सोने असेल तर तुम्ही त्यावरही कर्ज घेऊ शकता. गोल्ड लोन हे सुरक्षित कर्जाच्या श्रेणीमध्ये ठेवले जाते. तुम्हाला सध्याच्या सोन्याच्या किमतीच्या 75% पर्यंत कर्ज मिळू शकते. ही कर्ज देताना फारशी कागदपत्रे किंवा तुमचा CIBIL score पाहिला जात नाही

Leave a Comment