Low CIBIL Score Home Loan पात्रता

गृह कर्ज मंजूर करताना सिबिल स्कोर हा सर्वात महत्त्वाचा घटक मानला जात असला तरीही काही वित्तीय संस्था किंवा बँका चांगल्या सिबिल स्कोर च्या मर्यादेमध्ये थोडाफार बदल करून कमी सिबिल स्कोर म्हणजेच 650 किंवा त्यापेक्षा कमी सिबिल स्कोर असेल तर ते त्यांच्या स्वतःच्या हमीवर अर्जदाराला गृहकर्ज देऊ शकतात. पण या गृह कर्जासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीने खालील पात्रता पूर्ण करणे आवश्यक असते. त्या पात्रता कोणत्या आहेत हे खालील प्रमाणे:

  • गृह कर्जासाठी अर्ज करणारा अर्जदार हा एका प्रसिद्ध बहुराष्ट्रीय कंपनीत किंवा सरकारी संस्थेत काम करणारा असावा.
  • अर्जदार आणि अर्ज केलेल्या कर्जाच्या रकमेसाठी आवश्यक असलेल्या किमान पगारापेक्षा त्याचा पगार जास्त असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराला रोजगाराची चांगली स्थिरता असणे आवश्यक आहे. म्हणजे तो ज्या ठिकाणी नोकरी करतो तेथे तो 10 वर्षापेक्षा जास्त दिवस काम करत असला पाहिजे.
  • अर्जदार व्यक्तीचे बँकेची चांगले संबंध असणे आवश्यक आहे. म्हणजेच बँकेचे असणारे त्याचे आर्थिक व्यवहार चांगले असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार व्यक्ती हा संरक्षण अधिकारी, डॉक्टर, परिचारिका, वरिष्ठ शिक्षक, आयएएस अधिकारी इत्यादी सारख्या सन्माननीय व्यवसायामध्ये किंवा नोकरीमध्ये असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराने निवडलेल्या वित्तीय संस्थेचे किंवा बँकेचे मासिक उत्पन्नाचे निकष पूर्ण करणे आवश्यक आहे.
हे ही महत्वाचे👉  Navi Personal Loan App | याद्वारे मिळवा 10 हजार ते 20 लाख रुपये पर्यंतचे वैयक्तिक कर्ज...

अर्जदार व्यक्तीने वरील पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे, जर त्याचा सिबिल स्कोर कमी असेल आणि तो गृहकर्जासाठी अर्ज करत असेल तर वरील पात्रता आवश्यक आहेत.

Low CIBIL Score Home Loan कागदपत्रे

Low CIBIL Score Home Loan मिळवण्यासाठी खालील कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे आहे. ती कागदपत्रे कोणती आहेत ते खालील प्रमाणे:

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • कायमच्या पत्त्याचा पुरावा
  • कार्यालयीन पत्त्याचा पुरावा
  • उत्पन्नाचा पुरावा
  • बँक खात्यामधील पगाराचे विवरण
  • तीन महिन्याची पगार स्लिप
  • फॉर्म 16
  • जीएसटी नोंदणी प्रमाणपत्र/व्यापार परवाना

Low CIBIL Score Home Loan अर्ज प्रक्रिया

Low CIBIL Score Home Loan मिळवण्यासाठी ऑनलाइन अर्ज करून हे गृह कर्ज मिळवता येते. त्याबाबतची स्टेप बाय स्टेप माहिती खालील प्रमाणे: आपण या लेखांमध्ये एसबीआय बँकेकडून होम लोन कसे मिळवायचे हे पाहूया:

  • Low CIBIL Score Home Loan मिळवण्यासाठी सर्वप्रथम एसबीआयच्या या वेबसाईटवर जावे लागेल.👇🏽👉🏽 https://homeloans.sbi/
  • एसबीआयच्या या वेबसाईटवर जाऊन योनो अकाउंट लॉगिन करा.
  • होम पेजवर वरच्या डाव्या कोपऱ्यात असलेल्या मेनूवर क्लिक करा.
  • त्यानंतर लोन्स् वर क्लिक करून होम लोन्स् वर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमची जन्मतारीख देऊन आमची पात्रता तपासा.
  • तुमच्या उत्पन्नाविषयाची माहिती द्या.
  • त्यानंतर तुमचे निव्वळ मासिक उत्पन्न भरा.
  • तुम्ही घेतलेल्या इतर कर्जाची माहिती द्या.
  • तुम्हाला मिळू शकणाऱ्या कर्जाची रक्कम तपासणी पुढे जा.
  • इतर आवश्यक तपशील बरा आणि सबमिट वर क्लिक करा.
हे ही महत्वाचे👉  Low CIBIL Education Loan: कमी सिबिल स्कोर असला तरी मिळणार शैक्षणिक कर्ज... पहा संपूर्ण माहिती

त्यानंतर तुम्हाला रेफरन्स क्रमांक मिळेल आणि एसबीआय एक्झिक्यूटिव्ह तुमच्याशी होम लोन संदर्भात संपर्क करतील.

अशा सोप्या पद्धतीने low CIBIL score home loan ऑनलाइन अर्ज करता येतो.

सदर लेखामध्ये आपण low CIBIL score home loan कसे मिळवायचे याविषयीची संपूर्ण माहिती दिलेली आहे. सदर माहितीच्या आधारे तुम्ही गृह कर्ज मिळू शकतात. आम्ही आशा करतो की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडेल. धन्यवाद!

Leave a Comment