नमस्कार, सदर लेखामध्ये आपण शैक्षणिक कर्ज घेण्यासाठी कमीत कमी किती सिबिल स्कोर असणे आवश्यक आहे, तरच शैक्षणिक कर्ज मिळते याविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. बँकांकडून उच्च शिक्षण घेणाऱ्या तरुणांना शैक्षणिक कर्ज दिले जाते. पण हे कर्ज देताना सिबिल स्कोरच्या च्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारे मूल्यांकन बँकांकडून शैक्षणिक कर्ज अर्जाचे केले जाते. त्यामुळे शैक्षणिक कर्ज बँकांकडून घेण्यापूर्वी सिबिल स्कोर चे महत्व समजून घेणे खूपच आवश्यक आहे.
सदर लेखांमध्ये आपण कमी सिबिल स्कोर असेल तर शैक्षणिक कर्ज मिळू शकते काय? त्याचबरोबर याचा वित्त पुरवठ्यावर काय परिणाम होतो त्याचबरोबर कमी सिबिल स्कोर असेल तर या सिबिल स्कोर वर शैक्षणिक कर्ज देणाऱ्या बँका कोणत्या आहेत? याविषयीची संपूर्ण माहिती सदर लेखाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत.
शैक्षणिक कर्ज मिळवण्यासाठी सिबिल स्कोर आवश्यक आहे काय? | CIBIL for Education Loan
शैक्षणिक कर्ज मिळवण्यासाठी जो अर्जदार आहे त्या अर्जदाराची क्रेडिट पात्रता तपासण्यासाठी सिबिल स्कोर हा प्राथमिक घटका पैकी एक महत्त्वपूर्ण घटक आहे. तसे पाहायला गेले तर शैक्षणिक कर्ज हे असुरक्षित कर्जाच्या यादीमध्ये या खर्चाचा समावेश केला जातो त्यामुळे ही कर्ज देताना सिबिल स्कोर चे महत्व जास्त आहे.
उच्च सिबिल स्कोर असलेल्या कर्जदाराला किंवा विद्यार्थ्याला खालील वैशिष्ट्यसह कर्ज मिळू शकते.
- कर्जावरील कमी व्याजदर
- उच्च शिक्षण कर्जाची रक्कम
- परतफेडीचा दीर्घ कालावधी
- उच्च क्रेडिट मर्यादा
शैक्षणिक कर्जामधील CIBIL स्कोरचे महत्व
जेव्हा एखादा विद्यार्थी परदेशात किंवा आपल्या देशामध्ये शिक्षण घेण्याचे ठरवतो त्यावेळी त्याला शैक्षणिक कर्जे खूप महत्त्वपूर्ण ठरत असतात, कारण ते त्याच्या संपूर्ण शैक्षणिक प्रवासात महत्त्वपूर्ण आणि मोलाचे आर्थिक सहाय्य करत असतात. शैक्षणिक कर्जासाठी सिबिल स्कोर हा कर्ज स्वीकृतीवर परिणाम करणारे एक महत्त्वाचा घटक म्हणून ओळखला जातो.
शैक्षणिक कर्जासाठी अर्जदाराचा क्रेडिट स्कोर 300 ते 900 पर्यंतचा सिबिल स्कोर महत्त्वपूर्ण मानला जातो. किमान सिबिल स्कोर 700 किंवा त्याहून अधिक उच्च शैक्षणिक कर्ज मिळवण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. ज्यांचा सिबिल स्कोर उच्च आहे त्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज मिळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर वाढते, पण ज्यांचा सिबिल स्कोर 700 पेक्षा कमी आहे त्यांना शैक्षणिक कर्ज मंजुरीसाठी समस्या येऊ शकतात. आपण खाली हेच पाहणार आहोत की जर कमी सिबिल स्कोर असेल तर शैक्षणिक कर्ज कसे मिळवायचे.
शैक्षणिक कर्ज मिळवण्यासाठी कमीत कमी सिबिल स्कोर किती असावा लागतो?
शैक्षणिक कर्ज मिळवण्यासाठी पालक हे सहसा सह अर्जदार म्हणून काम करत असतात. बँका या शैक्षणिक कर्ज मंजूर करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या क्रेडिट स्कोर चा किंवा सिबिल स्कोर चा विचार करतात.
परंतु बऱ्याच वेळी असे दिसून येते की शैक्षणिक कर्जासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याकडे कोणताही क्रेडिट स्कोर किंवा सिबिल स्कोर नसतो, त्यामुळे या ठिकाणी पालक जे की हे कर्ज मिळवण्यासाठी सह अर्जदार आहेत त्यांचा क्रेडिट स्कोर किंवा सिबिल स्कोर शैक्षणिक कर्ज मंजुरी मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतो.
शैक्षणिक कर्ज मिळवण्यासाठी सिबिल स्कोर श्रेणी खालील प्रमाणे
- 300 ते 699 सिबिल स्कोर: या दरम्यान असलेला सिबिल स्कोर हा खराब सिबिल स्कोर म्हणून ओळखला जातो ज्यामुळे शैक्षणिक कर्जाच्या मंजुरीची शक्यता कमी होते. हे कर्ज मंजूर करून घेण्यासाठी अतिरिक्त आर्थिक कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक असते.
- 700 ते 749 सिबिल स्कोर: यादरम्यान सिबिल स्कोर असलेला व्यक्ती किंवा विद्यार्थी कर्ज मिळवण्यासाठी पात्र असेल, परंतु तुम्हाला सर्व अटी आणि आवश्यकता पूर्ण केल्याशिवाय शैक्षणिक कर्ज मिळू शकत नाही.
- 750 आणि त्यापेक्षा जास्त सिबिल स्कोर: या दरम्यान सिबिल स्कोर असलेला विद्यार्थी शैक्षणिक कर्जासाठी तात्काळ पात्र होतो. बँका किंवा वित्तीय संस्था या सिबिल स्कोर वर अधिक विश्वासार्हता दाखवतात.
शैक्षणिक कर्ज मिळवण्यासाठी 750 आणि त्यावरील सिबिल स्कोर चांगला मानला जातो. उच्च सिबिल स्कोर अर्जदारांना उच्च शिक्षण घेण्यासाठी तात्काळ आणि त्रास मुक्त शैक्षणिक कर्जाची हमी देते. शैक्षणिक कर्जाचा एखाद्या व्यक्तीच्या किंवा विद्यार्थ्याच्या सिबिल स्कोरवर परिणाम होतो. शैक्षणिक कर्जाची परतफेड सुलभ हप्त्यामध्ये केली जाते जेणेकरून सिबिल स्कोर चांगला होण्यास मदत होते.
कमी सिबिल स्कोर असेल तर शैक्षणिक कर्ज मिळू शकते का? | Low CIBIL Education Loan
जर कोणी शैक्षणिक कर्ज घेत असेल आणि त्याचा सिबिल स्कोर हा कमी असेल तर त्याला शैक्षणिक कर्ज मिळू शकते, पण शैक्षणिक कर्ज मिळवण्यासाठी काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या खालील प्रमाणे:
- व्याजदर: वित्तीय संस्था या अनेकदा जास्त व्याजदर आकारून कमी सिबिल स्कोर च्या जोखमीची भरपाई करत असतात.
- तारण: काही बँका तुम्हाला कर्ज सुरक्षित करण्यासाठी मालमत्ता, वाहन किंवा मुदत ठेव यासारखे तारण ठेवण्यास सांगू शकतात.
- सह अर्जदार/पालकांचा सिबिल स्कोर: शैक्षणिक कर्ज घेणाऱ्याचा सिबिल स्कोर कमी असल्यास बँका निर्णय घेण्यासाठी सह अर्जदाराच्या आर्थिक इतिहासावर अवलंबून असतात चांगला स्कोर असलेला सह अर्जदार तुमच्या शैक्षणिक कर्जाच्या मंजुरीची शक्यता वाढवू शकतो.
- नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्या: एचडीएफसी क्रेडीला, अव्हान्से फायनान्शियल सर्विसेस, इनक्रेड यासारख्या नॉन बँकिंग वित्तीय कंपन्या अनेकदा सिबिल स्कोर न तपासता ही शैक्षणिक कर्ज देऊ शकतात.
शैक्षणिक कर्जासाठी CIBIL स्कोरची अट शिथिल? न्यायालयाचा निर्णय
जर एखाद्या विद्यार्थ्याला पुढील शिक्षणाची शैक्षणिक कर्ज घ्यायचे असेल पण जर तुमचा सिबिल स्कोर कमी असेल तर तुम्हाला आता काळजी करण्याची गरज नाही, कारण आता सिबिल स्कोर हा शैक्षणिक कर्जाच्या मंजुरीचा आधार असू शकत नाही, असा निर्णय केरळ उच्च न्यायालयाने दिला आहे. या प्रकरणांमध्ये संबंधित विद्यार्थ्याला खराब सिबिल किंवा कमी सिबिल स्कोर मुळे शैक्षणिक कर्ज नाकारण्यात आले होते. त्यामुळे शैक्षणिक कर्जाबाबत थोडा मानवतावादी आधारावर निर्णय घ्या असे न्यायालयाने बँकांना बजावले. अशा स्थितीत विद्यार्थ्यांचा सिबिल स्कोर कमी किंवा खराब असल्याने त्यांचे अर्ज फेटाळणे हे योग्य नाही असे न्यायालयाने म्हटले आहे.
शैक्षणिक कर्ज मिळवण्यासाठी सिबिल स्कोर कसा सुधारायचा? | Improve CIBIL for Education Loan
जर एखाद्या विद्यार्थ्यांचा सिबिल स्कोर हा कमी असेल तर शैक्षणिक कर्ज मिळवणे खूपच अवघड किंवा अहवानात्मक असले तरी त्याला त्याचा सिबिल स्कोर सुधारून शैक्षणिक कर्ज मिळवणे सोपे आहे. सिबिल स्कोर कसा सुधारायचा हे आपण खाली पाहूया:
- सिबिल स्कोर सुधारण्यासाठी क्रेडिट कार्डच्या मर्यादा पाळणे आवश्यक आहे. चांगला सिबिल स्कोर ठेवण्यासाठी तुम्हाला क्रेडिट कार्डचा वापर 30% ते 50 टक्के दरम्यान ठेवणे आवश्यक आहे.
- सिबिल स्कोर सुधारण्यासाठी तुम्ही सर्व क्रेडिट आणि कर्ज वेळेवर भरणे आवश्यक आहे असे केल्याने तुमचा सिबिल स्कोर आणि शैक्षणिक कर्ज मिळवण्याची शक्यता वाढते.
- जर एखाद्या वेळेस तुम्ही एखादी कर्ज घेण्यासाठी अर्ज केला असेल आणि तो अर्ज जर फेटाळला गेला असेल तर लगेच दुसऱ्या कर्जासाठी अर्ज करू नका,कारण प्रत्येक वेळी वित्तीय संस्थेकडून मिळालेला नकार हा तुमचा सिबिल स्कोर कमी करण्यास कारणीभूत ठरू शकतो.
कमी सिबिल स्कोर असताना शैक्षणिक कर्ज मिळवण्याच्या पात्रता | Minimum requirements for Low CIBIL Education Loan
कमी सिबिल स्कोर असताना शैक्षणिक कर्ज मिळवण्यासाठी खालील पात्रता आवश्यक आहेत त्या खालील प्रमाणे:
- शैक्षणिक कर्जासाठी अर्ज करताना अर्जदाराचे वय किमान 18 वर्षे असणे आवश्यक आहे.
- शैक्षणिक कर्जासाठी पात्र होण्यासाठी भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे. किंवा तुमच्याकडे वैध भारतीय पासपोर्ट असणे आवश्यक आहे.
- मान्यता प्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून उच्च माध्यमिक शिक्षण किंवा समकक्ष अभ्यासक्रम पूर्ण करणे आवश्यक आहे.
- पदवी किंवा डिप्लोमा च्या अभ्यासक्रमासाठी तुम्ही भारतातील किंवा परदेशातील मान्यता प्राप्त संस्थेत प्रवेश निश्चित केला पाहिजे.
- जर तुमचा सिबिल स्कोर कमी असेल आणि तुम्हाला जर शैक्षणिक लोक हवी असेल तर अतिरिक्त आर्थिक कागदपत्रे देऊन तुम्ही हे कर्ज मिळू शकता.