फक्त गट नंबर टाकून महाराष्ट्रातील कोणत्याही जमिनीचा नकाशा आणि शेतरस्ते पहा

नमस्कार मित्रांनो एकदा आपल्याला आपल्या जमिनीचा नकाशा ची गरज भासते. परंतु हा नकाशा मिळवण्यासाठी तालुक्याच्या तहसीलदार कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. कितीही हेलपाटे मारले तरी बऱ्याच वेळा जमिनीचा नकाशा मिळत नाही. आपल्या जमिनीचा नकाशा आणि शेत रस्ते नकाशा प्रत्येकाकडे असणे अत्यंत आवश्यक आहे. या लेखात आपण जमिनीचे गट नंबर टाकून मोफत नकाशे कसे पाहायचे याबद्दल सविस्तर माहिती घेऊया.

महाराष्ट्र सरकारने ऑनलाईन सातबारा आणि 8अ उतारा सोबत जमिनीचे नकाशेही ऑनलाईन देण्यास सुरुवात केली आहे. या नकाशाच्या माध्यमातून जमिनीची हद्द तर माहित पडतेच त्याचबरोबर जमिनीला रस्ते कुठून आहेत याबद्दलही माहिती मिळते.

ऑनलाइन जमिनीचा नकाशा कसा पाहायचा

महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व जमिनींचे नकाशे डिजिटल स्वरूपात एका पोर्टलच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले आहेत. शेतकरी mahabhunakasha.mahabhumi.gov.in या पोर्टलवर जाऊन कोणत्याही जमिनीचा नकाशा तसेच गावचा नकाशाही पाहू शकतात. आता आपण जमिनीचा नकाशा कसा पाहायचा ते पाहूया

भु नकाशा वेबसाईटवर कसे  जायचे?

सर्वप्रथम, आपल्या गुगल ब्राऊजरमध्ये mahabhunakasha.mahabhumi.gov.in ही वेबसाईट सर्च करा.

त्यानंतर एक नवीन पेज तुमच्या स्क्रीनवर उघडेल. या पेजवरून तुम्ही तुमच्या गावाचा किंवा शेतजमिनीचा नकाशा पाहू शकता.

गावाचा नकाशा कसा काढायचा? | Village Map

भू नकाशा पाहण्याची  वेबसाईट ओपन झाल्यावर डाव्या बाजूला तुम्हाला Location नावाचा रकाना दिसेल. इथे आपलं राज्य निवडायचं आहे. यानंतर तुम्हाला दोन पर्याय दिसतील  Rural (ग्रामीण) आणि Urban (शहरी). आपण ग्रामीण भागात असल्यास Rural पर्याय निवडा, तर शहरी भागातील प्लॉटच्या नाकाश्यासाठी Urban पर्याय निवडायचा आहे.

आता  आपला जिल्हा, तालुका आणि गाव निवडून, village map या पर्यायावर क्लिक करा. आता तुमच्या गावाचा नकाशा दिसल.

भु नकाशा पोर्टल वरील आडव्या बाणावर क्लिक करून तुम्ही हा नकाशा फुल स्क्रीनमध्ये पाहू शकता.  डावीकडे असलेल्या + आणि – बटणांचा वापर करून नकाशा झूम जास्त किंवा झूम कमी करता येतो.

जमिनीचा गट क्रमांकानुसार नकाशा कसा पाहायचा

तुम्हाला तुमच्या जमिनीचा नकाशा पाहायचा असल्यास search by plot number या रकान्यात तुमच्या सातबारा उताऱ्यावरील गट क्रमांक टाका. यामुळे तुमच्या जमिनीचा गट नकाशा स्क्रीनवर उघडेल.

गट नकाशात डावीकडे plot info या रकान्याखाली तुमच्या जमिनीच्या मालकाचे नाव, त्याच्या नावावर किती जमीन आहे, याची सविस्तर माहिती दिलेली असते. एका गट क्रमांकात असलेल्या सगळ्या शेतकऱ्यांची माहिती इथे तपशीलवार पाहायला मिळते.

नकाशा  डाऊनलोड कसा करावा

वरील  मार्गदर्शनानुसार तुम्ही ऑनलाइन जमिनीचा नकाशा सहजगत्या काढू शकता

शेवटी  map report या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्या जमिनीचा plot report ओपन होईल. उजवीकडे खाली दिसणाऱ्या बाणावर क्लिक करून तुम्ही हा रिपोर्ट डाऊनलोड करू शकता.

सरकारने ऑनलाईन सातबारा उपलब्ध करून दिले आहेत

महाराष्ट्र सरकारकडे सर्व जमिनींचे जुने सातबारे उपलब्ध आहेत परंतु हे सातबारे जीर्ण झाले असल्यामुळे खराब होत आहेत हे सातबारे जतन करून ठेवण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या ई सेवा प्रकल्पांतर्गत सातबारा यांचे जतन करण्यासाठी डिजिटल स्वरूपात जतन केले जात आहे.

राज्यातील प्रत्येक अभिलेख कार्यालयातील जमीन नकाशे आणि इतर कागदपत्रांचे डिजिटल स्वरूपात जतन केले जात आहे. आता महाराष्ट्रातील कोणत्याही नागरिकांना शेतजमिनीचे नकाशे, शेतारस्ते ऑनलाइन पाहता येत आहेत.

Leave a Comment