तुमचा सिबिल स्कोर चेक करा मोबाईल वरून तेही पूर्णपणे मोफत…

नमस्कार मित्रांनो, सदर लेखामध्ये आपण सिबिल स्कोर मोबाईल वरून कसा चेक करायचा याविषयीचे माहिती पाहणार आहोत. दैनंदिन जीवनामध्ये पैसा खूप महत्त्वाचा आहे. एखादा व्यक्ती जेव्हा कर्ज घेणार असतो त्यावेळी बँक किंवा इतर वित्तीय संस्था या सदर व्यक्तीचा सिबिल स्कोर चेक करत असते, त्यानुसार त्या व्यक्तीला कर्ज द्यायचे की नाही हे त्या व्यक्ती या संस्थांकडून त्या व्यक्तीच्या सिबिल स्कोरवर ठरत असते.

आपल्याला जेव्हा कर्ज घ्यायचे असते किंवा क्रेडिट कार्ड तयार करायचे असते त्याचबरोबर पर्सनल लोन होम, लोन घेत असताना सर्वात आधी आपला क्रेडिट स्कोर त्यालाच आपण सिबिल स्कोर असेही म्हणतो तो चेक केला जात असतो. जर एखादी व्यक्ती कर्ज घेण्यासाठी प्रयत्न करत असेल तर त्याचा सिबिल स्कोर चांगला असेल तरच तुम्हाला क्रेडिट कार्ड किंवा लोन मिळत असते. अशावेळी जर तुम्हाला तुमचा सिबिल स्कोर आधीपासूनच काय आहे हे माहीत असेल तर तुम्हाला आधीच कळते की आपल्याला कर्ज किंवा क्रेडिट कार्ड मिळेल की नाही.

सदर लेखाच्या माध्यमातून आपण मोबाईल वरून सिबिल स्कोर कसा चेक करायचा याविषयीची संपूर्ण आणि सविस्तर माहिती पाहणार आहोत. चला तर मग पाहूया सिबिल स्कोर मोबाईल वर कसा चेक करायचा याची सविस्तर माहिती.

Cibil Score विषयी थोडक्यात…

सिबिल स्कोर हा कर्ज घेणाऱ्या व कर्जाची परतफेड करणाऱ्या व्यक्तीची गुणवत्ता दर्शवणारा आलेख मानला जातो. ज्याद्वारे त्या व्यक्तीला लोन द्यायचे की नाही ही बँक किंवा वित्तीय संस्थेकडून ठरवले जात असते. सिबिल स्कोर हा 300 ते 900 च्या दरम्यान मोजला जात असतो. जर एखाद्या व्यक्तीचा सिबिल स्कोर हा 750 च्या पुढे असेल तर हा सिबिल स्कोर कर्ज घेण्यासाठी चांगला मानला जातो.

हे ही महत्वाचे👉  SBI e-mudra Loan|SBI बँकेकडून मिळवा 10 लाख रुपयापर्यंतचे व्यवसाय कर्ज...

जास्तीत जास्त लोकांना सिबिल स्कोर चा फुल फॉर्म काय आहे हे माहित नाही. सिबिल स्कोर म्हणजे कर्ज मिळेल की नाही हे ठरवणारा एक गुणवत्ता दर्शक आलेख मानला जातो एवढेच माहित आहे. पण सिबिल स्कोर चा फुल फॉर्म Credit Information Bureau India Limited Score असा याचा अर्थ होतो.

कर्ज मिळवण्यासाठी सिबिल स्कोर कसा वाढवायचा?

जर कोणत्याही प्रकारचे लोन घ्यायचे असेल तर सर्वात आधी सिबिल स्कोर चेक केला जातो. जर सिबिल स्कोर कमी असेल तर लोन किंवा कर्ज मिळत नसते. म्हणूनच सिबिल स्कोर कसा वाढवायचा याबद्दलची काही महत्त्वपूर्ण गोष्टी आपण खाली पाहूया:

  • सिबिल स्कोर वाढवण्यासाठी तुम्ही घेतलेले कर्ज किंवा क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर भरणे गरजेचे आहे, जेणेकरून तुमचा सिबिल स्कोर झपाट्याने वाढेल. जर तुम्ही तुमचे कर्ज किंवा क्रेडिट कार्ड बिल वेळेवर भरले नाहीत तुमचा सिबिल स्कोर कमी होतो.
  • तुम्ही जर एकापेक्षा जास्त कर्ज घेत असाल तर तसेच क्रेडिट कार्डाचा 50% लिमिट पेक्षा जास्त वापर करत असाल तर तुमचा सिबिल स्कोर कमी होतो. त्यामुळे एकापेक्षा जास्त कर्ज घेऊ नये तसेच क्रेडिट कार्ड वापरताना त्याच्या लिमिटच्या 50% पेक्षा जास्त वापर करू नये.
  • तुमच्याकडे असणारे पैसे हे कॅश मध्ये न ठेवता ते तुमच्या बँक अकाउंट मध्ये राहिल्याने त्याचा परिणाम म्हणजे तुम्हाला कर्ज मिळवण्यास उपयोग होतो. त्यामुळे तुमचा सिबिल स्कोर वाढण्यास मदत होते.
  • जर का तुमचे उत्पन्न हे चांगले आणि शाश्वत असेल तर आणि त्याची देवाण-घेवाण तुम्ही बँकेच्या सहाय्याने करत असाल तर तुमचा सिबिल स्कोर वाढण्यास खूप मदत होते.
हे ही महत्वाचे👉  Google Pay Personal Loan मिळवण्यासाठीची पात्रता

Leave a Comment