CIBIL Score मोफत कसा चेक करायचा?

एखादा व्यक्ती वर्षातून एकदा त्याचा सिबिल रिपोर्ट विनामूल्य चेक करू शकतो.सिबिल स्कोर मोफत कसा चेक करायचा हे आपण खाली स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत.

  • सिबिल स्कोर मोफत पाहण्यासाठी सर्वप्रथम आपणाला सिबिलच्या वेबसाईट वरती जावे लागेल.👇🏽👇🏽👇🏽 https://cibil.com/freecibilscore
  • त्यानंतर Get Your CIBIL SCORE या पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमच्यासमोर एक फॉर्म ओपन होईल त्यामध्ये तुमची संपूर्ण माहिती अचूक पद्धतीने भरायची आहे.
  • फॉर्ममध्ये तुमची माहिती अचूक भरल्यानंतर तुमचे एक अकाउंट तयार होईल. त्या अकाउंटचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड तुम्हाला मिळेल. अकाउंट ऍक्टिव्ह करण्यासाठी तुमच्या ईमेल वरती एक मेल पाठवला जाईल त्याच्यात दिलेल्या लिंक वरती क्लिक करून तुमचे अकाउंट तुम्हाला सत्यापित करावे लागेल.
  • तुम्हाला मिळालेल्या लॉगिन आयडी आणि पासवर्ड चा वापर करून सिबिलच्या वेबसाईट वरती लॉगिन करून घ्यावी लागेल.
  • आता तुम्हाला काही सबस्क्रीप्शनची माहिती देण्यात येईल. त्यामध्ये तुम्हाला वर्षातून एकापेक्षा जास्त वेळा तुमचा सिबिल रिपोर्ट मिळवायचा असेल तर हे सबस्क्रीप्शन तुम्हाला घ्यावे लागेल. परंतु जर तुम्ही फक्त वर्षातून एकदाच तुमचा सिबिल रिपोर्ट पाहणार असाल तर तुम्हाला हा रिपोर्ट फ्री मध्ये पाहता येतो. यासाठी तुम्हाला सबस्क्रीप्शन घेण्याची आवश्यकता नाही.
  • नंतर तुम्हाला तुमच्या पॅन कार्ड नंबर सह तुमची अतिरिक्त माहिती भरावी लागेल. पॅन कार्डशी संबंधित माहिती बरोबर लिहिली आहे का हे सुनिश्चित करा.
  • आता तुम्हाला तुमचे कर्ज व क्रेडिट संबंधित काही प्रश्न विचारले जातील ज्याच्या आधारावर तुमच्या सिबिल स्कोर ची पूर्तता केली जाईल व तुमचा क्रेडिट अहवाल तयार केला जाईल. विचारलेल्या प्रश्नांची संपूर्ण आणि अचूक पद्धतीने उत्तरे द्या.
  • सर्वात शेवटी तुमचा सिबिल रिपोर्ट तयार होईल. इथे तुम्ही तुमचा सिबिल स्कोर पाहू शकता त्याचबरोबर तुमचा सिविल रिपोर्ट अहवाल डाऊनलोड ही करू शकता.
हे ही महत्वाचे👉  60,000 रुपये मिळणार, CIBIL स्कोअरची  गरजच नाही, असा करा अर्ज Without CIBIL/Credit Score ₹60,000 Loan

अशा पद्धतीने तुम्ही तुमचा सिबिल स्कोर मोबाईल द्वारे अगदी सोप्या पद्धतीने चेक करू शकता.

सदर लेखांमध्ये आपण मोबाईलद्वारे मोफत सिबिल स्कोर कसा चेक करायचा याविषयीची संपूर्ण माहिती अगदी अचूक स्वरूपात पाहिली आहे. सदर माहितीच्या आधारे तुम्ही तुमचा सिबिल स्कोर काय आहे हे मोबाईल वरून मोफत पणे चेक करू शकता. धन्यवाद!

Leave a Comment