ड्रायव्हिंग लायसन्स साठीची अर्ज प्रक्रियेविषयीची स्टेप बाय स्टेप माहिती खालील प्रमाणे:
- ड्रायव्हिंग लायसन्स साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. https://parivahan.gov.in
- होमपेज वर जाऊन तुमच्या राज्याचे नाव निवडा.
- त्यानंतर तुम्हाला online Services मध्ये जाऊन Sarathi services हा पर्याय निवडायचा आहे.
- यामध्ये तुम्हाला Apply New Learners Licence या पर्यावरण क्लिक करून Continue करायचे आहे. Applicant does not have any Driving lience/learner licence issued in India हा पर्याय निवडून Vai AdharAuthentication वर क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर ok हा पर्याय निवडून तुम्हाला तुमच्या आधार कार्ड वरील नंबर रिकाम्या जागी भरायचा आहे.
- त्यानंतर तुमच्या आधार कार्ड ला लिंक असलेल्या मोबाईल नंबर वरती ओटीपी येईल तो ओटीपी सबमिट करायचा आहे.
- त्यानंतर Accept Declaration सबमिट करायचे आहे.
- Dy.RTO निवडून आधार कार्ड शी संलग्न सर्व माहिती यामध्ये लिंक आधार कार्ड मधून भरली जाते त्यामुळे class of vehicle या पर्याय द्वारे आपल्याला कोणत्या वाहनाची लर्निंग लायसन हवे आहे हा पर्याय निवडावा यातून application number जनरेट होतो.
- एप्लीकेशन नंबर जनरेट झाल्यानंतर तुम्हाला 20 केबी पर्यंतची तुमची सही अपलोड करायची आहे.
- त्यानंतर लर्निंग लायसनची 150 रुपये फी देखील ऑनलाईन भरायची आहे.
- लर्निंग लायसनची भी भरल्यानंतर तुम्हाला २० मिनिटांचा रोड सेफ्टी व्हिडिओ पाहणे अनिवार्य आहे हा व्हिडिओ पाहून झाल्यावर 15 मार्काची तुमची एक परीक्षा होते या परीक्षेतील 9 प्रश्नांची उत्तरे बरोबर दिल्यास तुम्हाला लर्निंग लायसन मिळते.
- लर्निंग लायसन्स काढून झाल्यानंतर एक महिन्यानंतर तुम्ही परमनंट लायसन्स काढू शकता.
- लर्निंग लायसन ची मुदत सहा महिन्यापर्यंत असते.
ड्रायव्हिंग लायसन्स अर्जाची स्थिती कशी तपासायची
ड्रायव्हिंग लायसन्स अर्जाची स्थिती तपासण्याची स्टेप बाय स्टेप माहिती खालील प्रमाणे:
- अधिकृत वेबसाईटला भेट देऊन तुमच्या राज्याचे नाव निवडा.
- एप्लीकेशन स्टेटस वर क्लिक करून अर्ज क्रमांक जन्मतारीख आणि कॅपच्या कोड बॉक्समध्ये भरा.
अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्स अर्जाची स्थिती सोप्या पद्धतीने तपासू शकता.
ड्रायव्हिंग लायसन्स डाऊनलोड कसे करायचे?
ड्रायव्हिंग लायसन्स डाऊनलोड कसे करायचे याबद्दलची सविस्तर माहिती खालील प्रमाणे स्टेप बाय स्टेप पाहूया:
परिवहन वेबसाईट
- परिवहन विभागाच्या अधिकृत वेबसाईटला सर्वप्रथम भेट द्यावी लागेल. https://parivahan.gov.in
- ऑनलाइन सेवा आणि ड्रायव्हिंग लायसन्स संबंधित सेवा वर क्लिक करा.
- त्यानंतर दिलेल्या पर्यायामधून तुमचे राज्य निवडा.
- त्यानंतर एक विंडो उघडेल तेथून ड्रायव्हिंग लायसन्स ड्रॉप डाऊन मेनू निवडा.
- ड्रॉप डाऊन वरून प्रिंट ड्रायव्हिंग लायसन्स वर क्लिक करा.
- त्यानंतर तुमची जन्मतारीख अर्ज क्रमांक एंटर करा आणि कॅप्चा प्रदान करा.
- त्यानंतर सर्वात शेवटी सबमिट करा यावर क्लिक करून तुमचा परवाना तपशील दिसतील तेथून तुम्ही पीडीएफ स्वरूपात तुमची ड्रायव्हिंग लायसन्स डाउनलोड आणि सेव्ह करू शकता.
डीजी लॉकर (digilocker)
१. सर्वप्रथम तुम्ही डिजिलॉकरच्या वेबसाईटवर जा. https://digilocker.gov.in
२. जर तुमच्याकडे आधीपासूनच डीजी लॉकर खाते असल्यास तुमचे आधार , वापरकर्ता किंवा मोबाईल नंबर वापरून लॉगिन करा अन्यथा नवीन खाते तयार करा.
३. त्यानंतर पडताळणीसाठी तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर वर एक ओटीपी पाठवला जाईल.
४. त्यानंतर तुम्ही तुमच्या डिजिलॉकर खात्यासाठी सहा अंकी सुरक्षा पिन प्रदान करा.
५. जारी कागदपत्रे विभागातून ड्रायव्हिंग लायसन्स निवडा.
६. त्यानंतर तुमचा ड्रायव्हिंग परवाना क्रमांक प्रविष्ट करा आणि दस्तावेज मिळवा वर क्लिक करा.
७. त्यानंतर तुमची डिजिटल ड्रायव्हिंग लायसन्स तिथे असेल ते जतन करण्यासाठी फक्त डाऊनलोड करा वर क्लिक करा.
लर्निंग लायसन्स डाऊनलोड करा
लर्निंग लायसन्स कशी डाउनलोड करायची त्याबद्दलची स्टेप बाय स्टेप माहिती खालील प्रमाणे:
- सारथी परिवहन पोर्टलवर लर्नर लायसन्स मेनू ओपन करा.
- त्यानंतर प्रिंट लर्न लायसन्स (फॉर्म-३) निवडा.
- त्यानंतर तुम्हाला नवीन पृष्ठावर परवाना डाऊनलोड करण्यासाठीचे पर्याय दिसतील. त्यामध्ये अर्ज क्रमांक, परवाना क्रमांक, मोबाईल नंबर ही माहिती भरावी लागेल.
- नंतर तुम्ही तुमची जन्मतारीख आणि कॅप्चा कोड एंटर करा.
- सर्वात शेवटी तुम्ही लर्निंग लायसन्स डाऊनलोड करण्यासाठी सबमिट बटणावर क्लिक करा.
वरील तीन पद्धतीने ड्रायव्हिंग लायसन्स डाऊनलोड करता येतात.
सदर लेखामध्ये आपण ऑनलाइन पद्धतीने घरबसल्या ड्रायव्हिंग लायसन्स कसे काढायचे, त्याचबरोबर ड्रायव्हिंग लायसन्स डाऊनलोड कसे करायचे याबद्दलची सविस्तर माहिती पाहिली आहे. या माहितीच्या आधारे तुम्ही तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स काढू शकता. आम्ही आशा करतो की तुम्हाला हा लेख नक्कीच आवडला असेल. धन्यवाद!