कमी सिबिल स्कोर असतानाही शैक्षणिक कर्ज देणाऱ्या बँकांची यादी आता आपण पाहूया
Low CIBIL Education Loan
- सार्वजनिक क्षेत्रातील बँका: स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक या बँका कमी CIBIL स्कोर असेल तर शैक्षणिक कर्ज देतात.
- खाजगी क्षेत्रातील बँका: आयसीआयसीआय बँक, ॲक्सिस बँक, एचडीएफसी बँक या खाजगी क्षेत्रातील बँका कमी CIBIL स्कोर असताना सुद्धा शैक्षणिक कर्ज देतात.
- नॉन-बँकिंग वित्तीय संस्था: एचडीएफसी क्रेडीला, Avanse Finance Service, इनक्रेड यासारख्या नॉन- बँकिंग वित्तीय संस्था सुद्धा कमी सिबिल स्कोर असताना शैक्षणिक कर्ज देतात किंबहुना या संस्था कधीकधी सिबिल स्कोर न पाहता ही शैक्षणिक कर्ज देत असतात.
कमी सिबिल स्कोर असलेल्या शैक्षणिक कर्जाचे व्याजदर हे सामान्यतः जास्त असतात. सार्वजनिक क्षेत्रातील बँका या शैक्षणिक कर्जाचे व्याजदर 9 ते 12 टक्के पर्यंत आकारू शकतात. पण नॉन-बँकिंग वित्तीय संस्थांचे व्याजदर 11 ते 14 टक्के पर्यंत जोखीम मूल्यांकनावर अवलंबून आहेत.
कमी सिबिल स्कोर असताना शैक्षणिक कर्ज घेण्यासाठी ची आवश्यक कागदपत्रे | Documents for Low CIBIL Education Loan
कमी सिबिल स्कोर असताना शैक्षणिक कर्ज घेण्यासाठी ची आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे:
- ओळखीचा पुरावा (पासपोर्ट, आधार कार्ड, पॅन कार्ड इ.)
- पत्त्याचा पुरावा (युटिलिटी बिल)
- शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेतल्याचा पुरावा
- कोर्स फी तपशील
- शैक्षणिक रेकॉर्ड प्रदान करणे आवश्यक आहे.
- सहकर्जदार किंवा हमीदराच्या उत्पन्नाचा पुरावा (लागू असल्यास)
कमी CIBIL स्कोर असताना शैक्षणिक कर्जासाठी अर्ज प्रक्रिया
कमी सिबिल स्कोर असलेल्या अर्जदाराने शैक्षणिक कर्ज मिळवण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया एज्युकेशन लोन साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी स्टेप बाय स्टेप माहिती खालील प्रमाणे:
- सर्वप्रथम तुम्हाला स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शैक्षणिक कर्ज प्लॅटफॉर्मवर जावे लागेल.👇🏽👇🏽👇🏽 https://sbi.co.in/web/personal-banking/loans/education-loans
- त्यानंतर तुम्हाला कोणत्या प्रकारच्या शैक्षणिक कर्जासाठी अर्ज करायचा आहे ते निवडा.
- त्यानंतर नवीन पृष्ठावर आता ऑनलाइन अर्ज करा त्यावर क्लिक करा.
- सर्व आवश्यक माहितीसह फॉर्म भरून आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करा आणि अर्ज सबमिट करा.
- त्यानंतर तुम्हाला हव्या असलेल्या कर्जाचा प्रकार निवडा आणि नंतर जलद प्रक्रियेसाठी आवश्यक त्या गोष्टी पूर्ण करा.
त्याचबरोबर तुम्ही ऑनलाईन अर्ज प्रक्रिया बरोबर ऑफलाईन अर्ज ही शैक्षणिक कर्ज मिळवण्यासाठी करू शकता.
सदर लेखामध्ये आपण कमी सिबिल स्कोर असताना शैक्षणिक कर्ज कसे मिळवायचे याविषयीची संपूर्ण माहिती सदर लेखाच्या माध्यमातून पाहिली आहे. मी आशा करतो की तुम्हाला हा लेख नक्कीच आवडेल. धन्यवाद!