नमस्कार, आजच्या डिजिटल युगामध्ये पैश्यांसंबंधित महत्त्वाचे सर्व व्यवहार घरी बसून करता येत आहेत. त्यामध्ये ऑनलाइन शॉपिंग, मोबाईल रिचार्ज, टीव्ही रिचार्ज, विज बिल भरणे, त्याचबरोबर पैशाची घेवाणदेवाण अशी सर्व महत्त्वाची कामे घरी बसून करता येतात. यामध्ये आणखी एक भर पडली आहे ती म्हणजे आता ऑनलाईन कर्ज देखील घरबसल्या मिळू शकते. ऑनलाइन कर्ज देण्यासाठी बाजारामध्ये अनेक ॲप उपलब्ध आहेत. ऑनलाइन ॲप उपलब्ध असले तरी, Phonepay ही एक ऑनलाईन कर्ज देणारी नामांकित कंपनी आहे. यावरून एखाद्या व्यक्तीला जलद खर्च मिळू शकते.
तुम्हाला जर पैशाची खूपच गरज असेल तर तुम्ही आता फोन पे वरून पाच मिनिटात एक लाख रुपयांचे पर्सनल लोन मिळवू शकता. सध्या भारतातील ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी यूपीआय चा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. याची संपूर्ण श्रेय हे मोदी सरकारला दिले तर वावगे ठरणार नाही, कारण या सरकारने कॅशलेस व्यवहारावर मोठा भर दिल्याचे दिसून आले आहे. त्यामुळेच ऑनलाईन डिजिटल पेमेंटच्या वापरामध्ये खूप मोठी लक्षणीय वाढ झालेली दिसून येते. सरकारच्या निर्णयामुळेच बाजारामध्ये आता गुगल पे, फोन पे, ॲमेझॉन यासारखी डिजिटल अप्लिकेशन खूप मोठ्या प्रमाणावर आपापला प्रभाव त्यांच्या वेगवेगळ्या फीचर्सच्या माध्यमातून ग्राहकावर टाकत असल्याचे दिसत आहे.
म्हणूनच आपण सदर लेखांमध्ये फोन पे वरून लोन कसे घ्यायचे याबद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. फोन पे च्या माध्यमातून जलद किंवा तात्काळ पर्सनल लोन मिळू शकते. सदर लेखांमध्ये आपण पर्सनल लोन घेण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे आवश्यक आहेत? त्याचबरोबर फोन पे वरून लोन कसे घ्यायचे याविषयीची सविस्तर माहिती पाहूया.
Phonepay App विषय थोडक्यात…
देशभरातील सर्वात प्रसिद्धीस आलेले एप्लीकेशन म्हणजे फोन पे ॲप्लीकेशन होय. सध्याच्या घडीला देशामध्ये याचा वापर करणाऱ्या लोकांची संख्या कोटीच्या घरात आहे. यावरूनच या ॲपची विश्वासार्हता लक्षात येते. हे ॲप सर्वांसाठी सोयीस्कर असे ॲप आहे कारण हे ॲप व्यापारी वर्ग, शेतकरी वर्ग, नोकरदार वर्ग, विद्यार्थी, गृहिणी यासारख्या सर्वांना चांगले फीचर्स उपलब्ध करून देते. या ॲपच्या माध्यमातून पैशाची देवाण-घेवाण तर होतेच त्याचबरोबर क्यू आर कोड वापरून पैसे ट्रान्सफर केले जातात. मोबाईल रिचार्ज, डीटीएच रिचार्ज अशा प्रकारच्या सर्व सुविधा आपल्याला फोन पे मधून मिळतात.
Phonepay हे एक डिजिटल पेमेंट ॲप आहे, ज्या द्वारे याचा वापर करणारे मनी ट्रान्सफर, मोबाईल रिचार्ज, डीटीएच रिचार्ज, वीज बिल भरणे इत्यादी गोष्टी ऑनलाइन करू शकतात. फोन पे ॲप हे वरील सुविधा देण्याबरोबरच वापरकर्त्यांना आणखी एक सुविधा म्हणजे ऑनलाईन पर्सनल लोन देखील देत आहे.
हे ॲप Google Play Store वरून डाऊनलोड करता येते ते कसे डाउनलोड करायचे याबाबतची सविस्तर माहिती आपण पुढे पाहणारच आहोत. हे ॲप 100 दशलक्ष हून अधिक लोक वापरत आहेत आणि याचा रेटिंग 4.3 आहे. यावरूनच या ॲपची विश्वासार्हता लक्षात येते.
फोन पे च्या माध्यमातून ग्राहकांना पर्सनल लोन देण्याचे सुविधा उपलब्ध केलेली आहे. पर्सनल लोन देण्यासाठी फोन पे कंपनीने देशातील पाच बँकांसोबत करार केला असून, या बँकांनी फोन पे वापरकर्त्यांना पर्सनल लोन साठी संमती दर्शवली आहे. सध्या सर्व बँकांचे फोन पे सोबत पर्सनल लोन संबंधित काम सुरू आहे.
Phonepay personal loan आवश्यक कागदपत्रे
फोन पे वरून पर्सनल लोन घेण्यासाठी खालील महत्त्वाच्या कागदपत्रांची आवश्यकता असते ती कागदपत्रे कोणती आहेत ते खालील प्रमाणे:
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- सिबिल स्कोर जो कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचा 700 पेक्षा जास्त असावा लागतो.
फोन पे वरून पर्सनल लोन घेण्यासाठी कमीत कमी कागदपत्रांची आवश्यकता असते.