डिजिटल स्वरूपातील मतदान ओळखपत्र हे डाऊनलोड करण्याची स्टेप बाय स्टेप माहिती खालील प्रमाणे:
- सर्वप्रथम डिजिटल स्वरूपातील मतदान ओळखपत्र डाऊनलोड करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या वेबसाईटला भेट द्यावी लागेल.👇👇👇 https://voterportal.eci.gov.in
- येथे NVSP च्या https://www.nvsp.in/Account/Login या पेजवर जावे लागेल.
- लॉगिन करण्यासाठी तुमच्या अकाउंट असणे गरजेचे आहे.
- जर तुमचे अकाउंट नसेल तर ईमेल आयडी अथवा मोबाईल नंबर द्वारे अकाउंट तयार करू शकता.
- अकाउंट उघडल्यानंतर काही डिटेल्स भरून लॉगिन करू शकता.
- लॉगइन केल्यानंतर e-EPIC डाऊनलोड पर्याय दिसेल.
- डाउनलोडच्या पर्यायावर क्लिक करून तुम्ही सहजपणे पीडीएफ फाईल डाऊनलोड करू शकता.
अशा सोप्या पद्धतीने तुम्हाला तुमचे डिजिटल मतदान कार्ड डाउनलोड करता येते.
या लेखाच्या माध्यमातून आपण डिजिटल स्वरूपातील मतदान ओळखपत्रासाठी कसा अर्ज करायचा त्याचबरोबर हे मतदान ओळखपत्र डाऊनलोड कसे करायचे याबद्दलची संपूर्ण माहिती सविस्तर स्वरूपात दिली आहे. या माहितीच्या आधारे तुम्ही नवीन मतदान ओळखपत्र काढून घेऊ शकता. आम्ही आशा करतो की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडेल. धन्यवाद!