नमस्कार, मित्रांनो 2024 हे वर्ष निवडणुकीचे वर्ष म्हणून ओळखले जात आहे, कारण या वर्षांमध्ये लोकसभेची निवडणूक पार पडली, आणि आत्ता येणाऱ्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकांमध्ये मतदान करण्यासाठी मतदारराकडे एक ओळखपत्र असावे लागते, ओळखपत्र असल्याशिवाय मतदाराला किंवा त्या व्यक्तीला मतदान करता येत नाही. मतदार ओळखपत्र वयाची 18 वर्षे पूर्ण केलेल्या व्यक्तीलाच किंवा तरुणांना मिळत असते. म्हणजेच वयाची 18 वर्षे पूर्ण केलेली व्यक्ती मतदान करण्यासाठी पात्र असते.
मतदान करण्यासाठी मतदान कार्ड किंवा वोटर आयडी हे एक महत्त्वाचे कागदपत्र म्हणून काम करते. त्याशिवाय देशातील कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी ओळखपत्र म्हणून या मतदान कार्डाचा वापर केला जातो. देशामध्ये दरवर्षी कोणत्या ना कोणत्या राज्यात निवडणुका ह्या सुरूच असतात. आपल्या देशामध्ये तरुण लोकसंख्या ही मोठ्या प्रमाणात आहेत आणि निवडणूक प्रक्रियेमध्ये या तरुण लोकसंख्येचा सहभाग वाढताना दिसत आहे. या तरुणांनी जर त्यांच्या वयाची 18 वर्षे पूर्ण केली असतील तर ते मतदान करण्यासाठी पात्र असतात पण मतदान करताना त्यांच्याकडे मतदान ओळखपत्र असणे आवश्यक आहे. त्यासाठीच आपण सदर लेखांमध्ये सरकारी कार्यालयात न जाता घरबसल्या मतदान ओळखपत्र कसे बनवायचे याविषयीची संपूर्ण माहिती या लेखांमध्ये पाहणार आहोत.
मतदान ओळखपत्र(voter ID) कसे काढायचे?
केंद्र सरकारने 1 जुलै 2015 पासून डिजिटल अभियानांतर्गत शासन सर्व प्रकारचे शासकीय दस्तऐवज किंवा दाखले आणि सेवा डिजिटल पद्धतीने देशातील नागरिकांसाठी उपलब्ध करून देत आहे. या अभियानामध्ये भारतीय निवडणूक आयोगाचे राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल आणि वोटर हेल्पलाइन ॲप यांचाही समावेश केला गेला आहे. या ॲपद्वारे देशातील नागरिक मतदान ओळखपत्र साठी अर्ज करू शकतात. खाली आपण सविस्तर स्वरूपात आधार कार्ड वापरून नवीन मतदान कार्ड वोटर हेल्पलाइन ॲप (Voter Helpline App)च्या मदतीने कसे तयार करायचे याबद्दल पाहणार आहोत.
देशातील कोणताही नागरिक आपला मूलभूत हक्क म्हणजेच मतदानाला मुकु नये म्हणून त्याच्याकडे मतदान ओळखपत्र असणे आवश्यक आहे. यासाठी तो 18 वर्षे वय पूर्ण झालेला असणे आवश्यक आहे. भारतीय निवडणूक आयोगाने वोटर हेल्पलाइन ॲप सुरू केले आहे. या ॲपच्या माध्यमातून देशातील अठरा वर्षे पूर्ण झालेले सर्व नागरिक मतदान कार्ड साठी अर्ज करू शकतात. ज्या नागरिकांनी अद्याप मतदान कार्ड साठी या ॲपच्या माध्यमातून नोंदणी केलेली नाही ते सर्व नागरिक या ॲपद्वारे मतदान कार्डासाठी अर्ज करू शकतात.
मतदान ओळखपत्रची नोंदणी करण्यासाठी नागरिकांना कोणत्याही सरकारी कार्यालयामध्ये जाण्याची आवश्यकता नाही. जर नागरिकांकडे आधार कार्ड असेल आणि त्यांचे वय 18 वर्षे पूर्ण असेल तर वोटर हेल्पलाइन ॲप वर जाऊन काही मिनिटांमध्ये मतदान कार्ड साठी नागरिक ऑनलाईन अर्ज करू शकतात. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचतो.
ऑनलाइन पद्धतीने मतदान ओळखपत्र काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
ऑनलाइन पद्धतीने मतदान ओळखपत्र काढण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे:
- अर्ज करणारे व्यक्तीचे आधार कार्ड
- अर्जदाराचे बँक खाते
- ड्रायव्हिंग लायसन्स
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
ऑनलाइन पद्धतीने मतदान कार्ड काढण्यासाठीची आवश्यक पात्रता
ऑनलाइन पद्धतीने मतदान कार्ड काढण्यासाठी ची आवश्यक पात्रता खालील प्रमाणे:
- अर्ज करणारी व्यक्ती ही भारताचा नागरिक असावी.
- या मतदान कार्ड साठी अर्ज करणारी व्यक्तीचे वय हे 18 वर्षे पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे.
ऑनलाइन पद्धतीने मतदान ओळखपत्र काढण्याची अर्ज प्रक्रिया
ऑनलाइन पद्धतीने मतदान ओळखपत्र काढण्याचे अर्ज प्रक्रिया ही खूप सोपी आहे. त्याविषयीची स्टेप बाय स्टेप माहिती खालील प्रमाणे:
- ऑनलाइन पद्धतीने मतदान कार्ड काढण्यासाठी सर्वप्रथम या वेबसाईटवर जावे लागेल. 👇🏽👇🏽👇🏽 https://www.nvsp.in/
- त्यानंतर होम पेजवर ‘नवीन मतदार रजिस्ट्रेशन साठी ऑनलाईन अर्ज करा’ यावर क्लिक करा.
- क्लिक केल्यानंतर समोर स्क्रीनवर आलेला फॉर्म भरा. या फॉर्ममध्ये तुम्हाला तुमचे नाव, पत्ता, जन्मतारीख इत्यादी माहिती द्यावी लागेल.
- हा फार्म भरल्यानंतर तुम्हाला तुमच्या जन्मतारीख, पत्ता इत्यादीच्या पुराव्यासाठी कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
- वरील सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा.
- यानंतर तुम्ही जो ईमेल आयडी दिला आहे त्यावर मतदान ओळखपत्रासाठी लिंक सोबत एक ई-मेल येईल.
- याद्वारे तुम्ही तुमच्या मतदान ओळखपत्राचे स्टेटस पाहू शकता व तुम्हाला एक महिन्याच्या आत हे मतदान कार्ड मिळेल.
अशा पद्धतीने तुम्ही सोप्या पद्धतीने व घरबसल्या मतदान ओळखपत्रासाठी अर्ज करू शकता, त्यासाठी तुम्हाला कमी पैसे मोजावे तर लागतीलच त्याचबरोबर सरकारी कार्यालयाच्या चकरा विनाकारण माराव्या लागणार नाहीत, त्यामुळे तुमच्या वेळेची बचत होईल.
वोटर हेल्पलाइन ॲप (Voter Helpline App) चा वापर करून नवीन मतदान कार्ड कसे काढायचे?
वोटर हेल्पलाइन अँप च्या वापर करून नवीन मतदान कार्ड कसे काढायचे याविषयीची स्टेप बाय स्टेप माहिती खाली पाहूया:
- सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल वरील गुगल प्ले स्टोअर मध्ये जाऊन वोटर हेल्पलाइन ॲप इंस्टॉल करायचे आहे. खालील लिंक वर जाऊन तुम्ही हे ॲप इन्स्टॉल करू शकता.👇🏽👇🏽👇🏽 https://play.google.com/store/apps/details?id=com.eci.citizen
- तुमच्या मोबाईल मध्ये हे ॲप इंस्टॉल झाल्यानंतर ते ओपन करा. ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर Disclaimer ची माहिती दिसेल, खाली दिलेल्या Agree यावर टिक करून Next बटणावर क्लिक करा.
- त्यानंतर तुम्हाला ॲप ची भाषा निवडायची आहे.
- त्यानंतर नवीन पेजवर Voter Registration बटनावर क्लिक करायचे आहे.
- आता तुमच्यासमोर वेगवेगळ्या फॉर्म ची लिस्ट दिसेल त्यातील New Voter Registration (Form 6) वर क्लिक करा. हा फोन नवीन मतदान ओळखपत्र तयार करण्यासाठी वापरला जातो.
- त्यानंतर तुम्हाला नवीन पेजवर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. व Send OTP या बटणावर क्लिक करायचे आहे OTP आल्यानंतर तो दिलेल्या बॉक्समध्ये टाकायचा आहे म्हणून तर Verify OTP बटनावर क्लिक करायचे आहे.
- नवीन पेजवर तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील. 1. Yes, I am applying for the first time 2. No, I already have voter ID यापैकी तुम्हाला पहिला ऑप्शन सिलेक्ट करून Next बटनावर क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर तुम्हाला राज्य जिल्हा आणि विधानसभा मतदारसंघ(Assembly Constituency) निवडायचा आहे आणि तुमचा आधार कार्ड नंबर टाईप करायचा आहे.
- त्यानंतर तुम्हाला थोडे खाली स्क्रोल करून दिलेल्या कॅलेंडर मधून तुमची जन्मतारीख निवडायची आहे. त्यानंतर खाली तुमच्या जन्माचा पुरावा म्हणून डॉक्युमेंट अपलोड करायची आहेत. डॉक्युमेंट मध्ये तुम्ही पॅन कार्ड, आधार कार्ड, जन्माचा दाखला इत्यादी अपलोड करू शकता. सदर लेखामध्ये आपण आधार कार्ड द्वारे वोटर आयडी कसा काढायचा हे पाहत आहोत त्यामुळे येथे आपण आधार कार्डचा वापर करत आहोत.
- पण या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट हे सेल्फ अटेस्टिड करायची आहेत म्हणजेच जे डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करणार आहात ते आधी झेरॉक्स किंवा कलर प्रिंट काढून तुमची त्यावर सही करायचे आहे आणि नंतर ते डॉक्युमेंट स्कॅन किंवा मोबाईलवर फोटो काढून अपलोड करायची आहेत.
- डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर तुम्हाला preview section दिसेल आणि नंतर next बटन वर क्लिक करायचे आहे.
- यानंतर तुम्हाला नवीन पेजवर तुम्हाला तुमचा फोटो अपलोड करायचा आहे हा फोटो मतदान कार्ड वर छापून येणार आहे या फोटोची साईज 200 KB पेक्षा जास्त नसावी याची काळजी घ्यावी लागेल.
- नंतर खाली स्क्रोल करून तुमचे लिंक (Gender) निवडा. त्यानंतर तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती द्यायची आहे जसे की नाव,आडनाव. पण या ठिकाणी एक एक बाब लक्षात ठेवायचे आहे की आधार कार्डवर जे नाव आहे जसेच्या तसे तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहे. जेव्हा तुम्ही तुमचे नाव इंग्लिश मध्ये टाईप कराल तेव्हा खाली मराठीमध्ये ते ऑटोमॅटिक टाईप होईल.
- त्यानंतर खाली मोबाईल नंबर ईमेल टाईप करा तुम्हाला कोणते अपंगत्व(Disability) असेल तर ते निवडा आणि शेवटी next बटनावर क्लिक करा.
- आता तुम्हाला तुमच्या जवळच्या व्यक्तीची माहिती द्यायची आहे ज्या व्यक्तीकडे आधीपासून मतदान कार्ड आहे. Relation Type मध्ये तुम्ही त्या व्यक्तीचा तुमच्याशी असलेला संबंध निवडायचा आहे.
- त्यानंतर खाली त्या व्यक्तीचा EPIC नंबर टाकायचा आहे.EPIC नंबर म्हणजे त्या व्यक्तीचा मतदान ओळखपत्र नंबर होय. त्या व्यक्तीचा मतदान ओळखपत्र नंबर लिहिणे सक्तीचे नाही पण तुम्ही जरूर लिहा. त्यानंतर त्या व्यक्तीची वैयक्तिक माहिती भरायची आहे इंग्लिश आणि मराठी मध्ये जसे की नाव, आडनाव आणि नंतर next बटन वर क्लिक करायचे आहे.
- आता तुम्हाला तुमचा संपूर्ण पत्ता टाकायचा आहे. Select Address Proof मध्ये आधार कार्ड निवडा. आणि खाली तुम्ही तुमचे आधार कार्ड अपलोड करा. पण तुम्हाला हे डॉक्युमेंट सेल्फ अटेस्टिड करायचे आहे. ते कसे करायचे याची माहिती आपण वर पाहिलीच आहे. डॉक्युमेंट यशस्वीरित्या अपलोड झाल्यानंतर तुम्हाला preview section वर दिसेल आणि नंतर next बटन वर क्लिक करायचे आहे.
- आता शेवटी तुम्ही राज्य जिल्हा आणि गाव निवडा नंतर आधी दिलेला पत्त्यावर तुम्ही कधीपासून राहता ते सिलेक्ट करा वर्ष/महिने. नंतर तुमचे नाव टाका आणि सध्याचे ठिकाण टाकून Done बटनावर क्लिक करा.
- फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुम्हाला एक Reference ID दिला जाईल. तो तुम्ही save करून ठेवायचा आहे. कारण तो Reference ID तुम्हाला नंतर स्टेटस चेक करण्यासाठी लागणार आहे.
- आता तुम्ही होम पेज वरती येऊन तुम्ही मतदान कार्डचा स्टेटस चेक करू शकता त्यासाठी तुम्हाला उजव्या कोपऱ्यात असलेल्या एक्सप्लोर बटन वर क्लिक करायचे आहे नंतर स्टेटस ऑफ एप्लीकेशन या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर तुम्ही Reference ID टाकून तुमच्या मतदान कार्डचा स्टेटस चेक करू शकता.
अशाप्रकारे तुम्हाला नवीन वोटर आयडी साठी ऑनलाईन अर्ज करता येतो अर्ज केल्यानंतर 15 ते 30 दिवसांमध्ये कागदपत्राची तपासणी होऊन मतदान कार्ड तयार झाल्याचा मेसेज तुमच्या मोबाईलवर येईल तुम्ही डॅशबोर्ड वर कार्ड तयार झाल्यानंतर त्याची डिजिटल कॉपी डाऊनलोड करू शकता आणि ऑफलाइन कार्ड साधारणपणे 3 ते 6 महिन्याच्या आत तुमच्या पत्त्यावर पोस्टाने पाठवली जाईल.