घरबसल्या असे बनवा सोप्या पद्धतीने ड्रायव्हिंग लायसन्स फक्त 220 रुपयात…

नमस्कार, सदर लेखांमध्ये आपण घरी बसून ड्रायव्हिंग लायसन्स कशी काढायची त्याचबरोबर डाऊनलोड कशी करायची याबद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. गाडी चालवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणे खूप गरजेचे किंवा अनिवार्य आहे. कारण ड्रायव्हिंग लायसन्स हा एक खूप महत्त्वाचा दस्तऐवज आहे. आज-काल तरुण मुला-मुलींना फार कमी वयात गाड्या मिळाल्यामुळे त्यांच्याकडे लायसन्स नसते, त्यामुळे त्यांना दंडाला सामोरे जावे लागते. त्यामुळेच लायसन्स असणे खूप महत्त्वाचे आहे जेणेकरून तुम्हाला ट्रॅफिक पोलिसांकडून होणाऱ्या दंडाला सामोरे जावे लागणार नाही.

भारतामध्ये ड्रायव्हिंग लायसन्स आहे अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. हा दस्तऐवज केवळ वाहन चालवण्याचा परवाना नसून तर तो दस्तऐवज वैयक्तिक ओळखपत्र म्हणूनही महत्त्वपूर्ण आहे. यापूर्वी आरटीओ ऑफिस ला जाऊन ड्रायव्हिंग लायसन्स काढणे ही प्रक्रिया खूपच किचकट होती. त्यामुळे बरेच लोक हे ड्रायव्हिंग लायसन्स काढण्याचा कंटाळा करत असत. पण सरकारने ही प्रक्रिया आता सोपी केली आहे. ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून कोणालाही लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स सहजपणे काढता येते.

घरबसल्या ड्रायव्हिंग लायसन्स साठी कोणताही व्यक्ती ऑनलाईन अर्ज करू शकतो. या प्रक्रियेमुळे घरबसल्या ड्रायव्हिंग लायसन्स काढणे खूपच सोपे झाले आहे. त्याचबरोबर वेळ आणि पैशाची ही बचत होते. चला तर मग सविस्तरपणे पाहूया घरबसल्या ड्रायव्हिंग लायसन्स कशी काढता येते.

ड्रायव्हिंग लायसन्स अर्ज करण्यासाठीची पात्रता

घरबसल्या ड्रायव्हिंग लायसन्स चा अर्ज करण्यासाठीची पात्रता ही खालील प्रमाणे आहे.

  • ड्रायव्हिंग लायसन्स चा अर्ज करणारा अर्जदार हा भारताचा रहिवासी असावा.
  • अर्जदाराचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे, ही पात्रता खूप महत्त्वाची आहे कारण 18 वर्षापेक्षा कमी वयाचा कोणताही तरुण या ड्रायव्हिंग लायसन्स साठी अर्ज करू शकत नाही, परंतु गियर नसलेल्या वाहनांसाठी वयाची मर्यादा ही 16 वर्षे आहे.
  • ड्रायव्हिंग लायसन्स साठी अर्ज करणारा अर्जदार हा मानसिक दृष्ट्या निरोगी असणे खूपच आवश्यक आहे.
  • ड्रायव्हिंग लायसन्स साठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराला वाहतूक नियमांची माहिती असणे आवश्यक आहे.
हे ही महत्वाचे👉  मोबाईल वरून करा जमिनीची मोजणी तेही फक्त पाच मिनिटांत | Land Area Calculator App Download

ड्रायव्हिंग लायसन्ससाठी आवश्यक कागदपत्रे

ड्रायव्हिंग लायसन्स साठी खालील कागदपत्रे ही खूपच आवश्यक आहेत.

  • आधार कार्ड
  • पत्त्याच्या पुराव्यासाठी रेशन कार्ड, पॅन कार्ड, विज बिल
  • जन्म तारखेच्या प्रमाणपत्रासाठी किंवा पुराव्यासाठी दहावीचे बोर्ड सर्टिफिकेट, जन्म प्रमाणपत्र
  • पासपोर्ट साईज फोटो
  • अर्जदाराची सही
  • वाहन शिकण्याचा परवाना क्रमांक
  • मोबाईल नंबर

वरील सर्व कागदपत्रे ही ड्रायव्हिंग लायसन्स साठी अनिवार्य आहेत.

Leave a Comment