Navi Personal Loan App | याद्वारे मिळवा 10 हजार ते 20 लाख रुपये पर्यंतचे वैयक्तिक कर्ज…

नमस्कार, या लेखामध्ये आपण Navi ॲप मधून पर्सनल लोन कसे मिळवायचे याविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. काही वेळा अचानक पणे किंवा अनपेक्षित पणे संकटकालीन किंवा आपत्कालीन परिस्थिती उद्भवते, ज्यासाठी एखादी व्यक्ती आर्थिक दृष्ट्या सक्षम नसते तरीही अशा परिस्थितीतत पैसे त्वरित मिळणे खूप आवश्यक असते. यावेळी बँकेकडून वैयक्तिक कर्ज घ्यायचे म्हटले तरी ही प्रक्रिया वेळ खाऊ असल्याने त्वरित कर्ज मिळणे खूप आवश्यक असल्याने हा बँकेचा पर्याय या ठिकाणी काम करत नाही, त्यामुळेच आता काही मिनिटातच वैयक्तिक कर्ज मिळवण्याची प्रक्रिया उपलब्ध झाली आहे. यातून एखाद्या व्यक्तीला त्वरित कर्ज मिळू शकते. यासाठी नावी पर्सनल लोन ॲप डाऊनलोड करणे आवश्यक आहे. त्यामध्ये कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचा तपशील दिल्यानंतर कर्ज मंजूर होते आणि ते बचत खात्यात त्वरित जमा केले जाते.

या लेखामध्ये आपण Navi Personal Loan App विषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. यामध्ये ही लोन मिळवण्यासाठी कोण पात्र आहेत त्याचबरोबर आवश्यक कागदपत्रे व्याजदर याविषयीची संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप पाहूया.

Navi Personal Loan विषयी थोडक्यात…

Flipkart Founder सचिन बन्सल यांनी पर्सनल लोन ची गरज ओळखून एक पर्सनल लोन आणि आरोग्य विमा ॲप विकसित केले आहे. ज्या द्वारे सोईस्कर डिजिटल लोन घेण्याचे ॲप म्हणून काम करते. या ॲपच्या माध्यमातून एखादी व्यक्ती 20 लाख रुपयांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज मिळू शकतो. या ॲपच्या माध्यमातून व्यक्तींना देण्यात आलेल्या कर्जाचा कालावधी हा 72 महिन्याचा आहे. हे कर्ज मिळवण्यासाठी एखाद्या व्यक्तीकडे आधार कार्ड आणि पॅन कार्ड असेल तर कर्ज मिळून खूपच सोपे आहे. हे कर्ज मिळवण्यासाठीची अर्ज प्रक्रिया सोपी आणि पूर्णपणे ऑनलाईन आहे त्यामुळे प्रत्यक्ष कोणाशी भेट किंवा संवादाची आवश्यकता सुद्धा भासत नाही.

हे ही महत्वाचे👉  Slice Personal Loan स्लाइस ॲपमधून 50 हजार रुपये बिनव्याजी कर्ज

Navi Personal Loan App हे जास्तीत जास्त तीस वर्षाच्या कालावधीसाठी 5 कोटी किंवा एखाद्या व्यक्तीच्या मालमत्तेच्या मूल्याच्या 90% पर्यंत गृह कर्ज देते. त्याशिवाय आरोग्य विमा आणि मॅच्युअल फंड सुद्धा या ॲपच्या माध्यमातून दिला जातो. या ॲपचे व्यवस्थापन Navi Technologies Limited द्वारे केले जाते. Navi App आरबीआयच्या नियामक फ्रेमवर्क मध्ये काम करते आणि कायदेशीर वित्तीय संस्था म्हणून ओळखले जाते.

Navi Personal Loan App वैशिष्ट्ये आणि फायदे

नावी पर्सनल लोन ॲप ची वैशिष्ट्ये आणि फायदे खालील प्रमाणे आहेत:

  • या ॲपच्या माध्यमातून त्वरित कर्ज वितरण केले जाते. एखाद्याला कर्ज मिळण्यासाठी तीन-चार दिवस प्रतीक्षा करण्याची आवश्यकता नाही.
  • या ॲप द्वारे केली जाणारी कर्ज प्रक्रिया ही 100% पेपरलेस प्रक्रिया आहे त्यामुळे या कर्जासाठी कोणत्याही कागदपत्राची आवश्यकता नाही.
  • या ॲप मधून कर्ज मिळवून तुम्ही ईएमआय द्वारे सोयीस्करपणे या कर्जाची परतफेड करू शकता. यामध्ये तुम्हाला ६ वर्षे किंवा 48 महिन्यापर्यंतचा कर्ज परतफेड पर्याय दिला जातो.
  • ही कर्ज मिळवण्यासाठी एखाद्या व्यक्तीला तारण किंवा जामीनदाराची गरज नाही हा एक सर्वात मोठा फायदा या नावी पर्सनल लोन ॲपचा आहे.

Navi Personal Loan App उपलब्ध असलेली इतर कर्जे

नावी पर्सनल लोन ॲप मध्ये अनेक कर्ज उपलब्ध आहेत ते खालील प्रमाणे:

  • यामध्ये एखादा व्यक्ती दुचाकी गाडीसाठी वैयक्तिक कर्ज घेऊ शकता. अर्ज आणि वितरण प्रक्रियेद्वारे कर्जाची परतफेड एखादी व्यक्ती करू शकते.
  • तुम्ही जर एखादे वाहन खरेदी करत असाल तर नावीमार्फत वैयक्तिक कार कर्ज मिळते. डिजिटल प्रक्रियेद्वारे त्वरित कर्ज वितरणाचा फायदा घेता येतो.
  • या ॲपद्वारे ट्रॅव्हल लोन ही उपलब्ध आहे उत्तम व्याजदर आणि सहा वर्षाच्या कर्जत फेरी योजनेसह तुम्ही तणावमुक्त प्रवासाचा अनुभव घेऊ शकता.
  • या ॲपमध्ये मोबाईल लोन ही उपलब्ध आहे, त्यासाठी ग्राहकांना कोणत्याही कागदी कागदपत्राच्या गरजेशिवाय नवीन मोबाईल खरेदी करण्यासाठी लोन दिले जाते.
  • नावी ॲप विवाह कर्ज 100% पेपरलेस प्रक्रियेद्वारे त्वरित मंजुरी सह स्पर्धात्मक व्याजदर आणि लवचिक ईएमआय पर्यायची हमी देते.
हे ही महत्वाचे👉  Slice Personal Loan स्लाइस ॲपमधून 50 हजार रुपये बिनव्याजी कर्ज

Navi personal loan App किती कर्ज घेता येते?

या ॲपच्या माध्यमातून वैयक्तिक कर्जाच्या गरजेनुसार 10,000 ते 20 लाख रुपये पर्यंतचे कर्ज मिळते. या कर्जाची परतफेडीची मुदत 3 महिने ते 72 महिने असते.

Navi personal loan रद्द करता येते का?

नावी पर्सनल लोन हे एखाद्या व्यक्तीला रद्द करायचे असल्यास त्याने घेतलेल्या कर्जाची उर्वरित रक्कम भरून, तसेच कर्ज लवकर फेडण्यासाठी कोणते अतिरिक्त शुल्क लागणार नाही. अशा रीतीने एखादा व्यक्ती मध्येच त्याचे कर्ज रद्द करू शकतो.

Leave a Comment