जमीन आणि गाव नकाशा वेबसाईटवर कसा पाहायचा

ऑनलाईन पोर्टल च्या माध्यमातून महाराष्ट्रातील कोणत्याही जमिनीचा नकाशा पाहता येतो. ऑनलाईन पद्धतीने Land Map पाहणे अत्यंत सोपे आहे. आता आपण भूनकाशा कसा पाहायचा ते पाहूया…

मित्रानो सर्वप्रथम आपल्याला महाराष्ट्र सरकारच्या mahabhunakasha.mahabhumi.gov.in या वेबसाईट वर जायचे आहे.

सर्वप्रथम वेबसाईट वर डाव्या बाजूला राज्य निवडा या पर्यायावर क्लिक करून महाराष्ट्र राज्य निवडा.

त्यानंतर Rural (ग्रामीण) किंवा Urban (शहरी) यापैकी तुमचा पर्याय निवडा. आता तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे.

Select your Village, Tehsil and District

जिल्हा निवडल्यानंतर तुमच्या जिल्ह्यातील सर्व तालुक्यांची यादी दिसेल, त्यापैकी तुमचा तालुका निवडा.

यानंतर तुम्हाला तुमचे गाव निवडायचे आहे, गाव निवडल्यानंतर तुम्हाला तुमच्या गावाचा नकाशा दिसू लागेल. यात गावातील प्रमुख रस्ते ही दिसतील

आता तुम्हाला तुमच्या जमिनीचा नकाशा पाहण्यासाठी गट नंबर टाकायचा आहे. गट नंबर टाकल्यानंतर तुम्हाला तुमच्या जमिनीचा नकाशा दिसेल.

हे ही महत्वाचे👉  HDFC bank e-mudra loan पात्रता

Leave a Comment