एचडीएफसी बँक ई-मुद्रा लोन घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराला तो अर्जदार खाली दिलेल्या पात्रतेमध्ये बसत असला पाहिजे. त्या पात्रता कोणत्या आहेत हे आपण खाली पाहूया:
- या योजनेसाठी अर्ज करणारी व्यक्ती भारताचा नागरिक असावी.
- या योजनेसाठी अर्ज करणारी व्यक्ती ही 18 वर्षापेक्षा जास्त वयाची असावी.
- सिबिल स्कोर चांगला असावा.
- या योजनेसाठी लागणारी सर्व आवश्यक कागदपत्रे अर्ज करणाऱ्या व्यक्तीकडे असावीत.
- एचडीएफसी बँक ई मुद्रा लोन साठी पात्र होण्यासाठी अर्जदार व्यक्तीचा नियमित उत्पन्नाचा स्त्रोत असणे आवश्यक आहे.
HDFC bank e-madra loan आवश्यक कागदपत्रे
एचडीएफसी बँक ई-मुद्रा लोन साठी अर्जदाराकडे अर्ज करताना खालील कागदपत्रे आवश्यक आहेत:
- ओळखपत्र: मतदार ओळखपत्र, पॅन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट, रेशन कार्ड
- पत्त्याचा पुरावा: मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड, विज बिल
- आय प्रमाणपत्र: अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे मागील 2 वर्षाचे आयकर विवरण पत्र, मागील 1 वर्षाची व्यवसायाची बॅलन्स शीट, मागील 3 महिन्याची बँक स्टेटमेंट
- पासपोर्ट साईज फोटो
- व्यवसाय प्रमाणपत्र आणि पत्ता
- अर्जदार व्यक्तीचा सक्रिय मोबाईल नंबर
HDFC Bank e-mudra loan अर्ज प्रक्रिया
एचडीएफसी बँक ही मुद्रा लोन साठी अर्ज करताना अर्जदाराने खालील स्टेप बाय स्टेप माहिती फॉलो करा. जेणेकरून अर्जदाराला अर्ज भरताना कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागणार नाही.
- या योजनेअंतर्गत कर्ज मिळवण्यासाठी एचडीएफसी बँकेची अधिकृत वेबसाईटवर जा.👇🏽👇🏽👇🏽 https://www.hdfcbank.com
- त्यानंतर मुखपृष्ठावर LOAN च्या अंतर्गत BUSINESS LOAN वर क्लिक करा.
- त्यानंतर तुम्हाला या योजनेअंतर्गत रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा लागेल, त्यानंतर मोबाईल नंबर आणि इतर माहिती द्या आणि ओटीपी द्वारे व्हेरिफाय करा.
- नंतर युजर आयडी आणि पासवर्ड मिळवून लॉगिन करा.
- Check Eligibility बटणावर क्लिक करा.
- पात्रता तपासून Apply Now बटनावर क्लिक करा.
- त्यानंतर तुम्हाला ज्या प्रकारातून लोन पर्याय निवडायचा आहे तो पर्याय निवडा. (शिशु, किशोर, आणि तरुण यापैकी एक)
- त्यानंतर पुन्हा एकदा आवश्यक ती माहिती भरा आणि या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे अपलोड करा.
- सर्वात शेवटी अर्जावर भरलेली माहिती पुन्हा एकदा तपासून अर्ज सबमिट करा आणि सत्यापन प्रक्रियेसाठी प्रतीक्षा करा.
अशा प्रकारे या योजनेचा अर्ज अर्जदार अगदी सोप्या पद्धतीने करू शकतो.
एचडीएफसी बँक ई-मुद्रा लोन योजनेची संपूर्ण माहिती म्हणजे या योजनेअंतर्गत कर्ज कसे मिळवायचे याबद्दलची माहिती आपण अगदी सोप्या पद्धतीने पाहिली आहे. आम्ही आशा करतो की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडेल, त्याचबरोबर या माहितीच्या आधारे तुम्ही या योजनेचा लाभ घ्याल. धन्यवाद!